Breaking
महाराष्ट्र

लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राइड व हरित सेनेच्या वतीने वृक्षारोपण; वृक्ष संवर्धनासाठी ५१०० रुपयांची मदत जाहीर

1 1 4 6 5 0

न्यायभूमी 

लासलगाव दि.०२ ऑगस्ट प्रतिनिधी कैलास उपाध्ये 

लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राइड आणि हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज लासलगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज असून,वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे, असा संदेश या वेळी देण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान लायन्स क्लब ऑफ लासलगाव प्राइडतर्फे हरित सेना यांना वृक्षारोपण कार्यासाठी ५,१०० रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विषद केले.

या उपक्रमात हरित सेना आणि लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष हेमंत पवार, उपाध्यक्ष राजाबाबा होळकर, महेश वर्मा, सचिव दीपक जाधव,शीतल जाधव,माया होळकर, मंजुषा पाटील,डॉ. भाग्यश्री सोनवणे,डॉ.सोनल सोनवणे, निलेश लचके, अमित गंभीरे, संजय बिरार,प्रदीप माठा,संतोष पलोड, ऋषिकेश जोशी, शैलजा भावसार, कविता बिरार,निलेश वर्मा, आनंद वाघचौरे, संतोष सोनार, जाधव साहेब,हेमलता चव्हाण, रश्मी माठा आदींसह मान्यवर व सदस्य उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 4 6 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे