निफाड तालुक्यातील वेळापूर येथे मातीपासून बनवलेल्या बैलांना रंग देताना कारागीर
चाहूल पोळ्याची.. लगबग मातीचे बैल बनविण्याची
न्यायभूमी न्यूज
लासलगाव दि १५ ऑगस्ट निशिकांत पानसरे
वेळापूर,येथील मातीपासून चुलीपासून ते गाडगी, मडकी,पणत्या,बोळकी,रांजण बनवून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या कुंभार बांधवांची श्रावण महिन्याच्या शेवटी येणाऱ्या पोळा सणासाठी मातीचे बैल बनविण्याची लगबग सुरू झाली आहे.

पोळा सण दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे हाताला काम व संसाराला हातभार लागण्यास मदत होते.
मातीत राबणाऱ्या सर्जा-राजाप्रति ऋणानुबंध ओपासत बळीराजा पोळ्याच्या दिवशी मातीच्या बैलाची पूजा करतात व दुसऱ्या दिवशी हे मातीचे बैल शेतात ठेवले जातात.है बैल घरोघरी पोहोचविण्याचे काम कुंभार बांधव करतात.
पोळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाल्यावर कुंभार बांधव एक महिना अगोदर बैल बनविण्याच्या कामाला सुरुवात करतात.

वडिलोपार्जित असलेला व्यवसाय आम्ही अजून टिकवून ठेवला आहे;परंतु पुढील पिढी या दिसत आहे. कारण जुन्या काळी व्यवसायापासून दूर जाताना मातीपासून तयार केलेल्या बैलांच्या मोबदल्यात वर्षभर पुरेल एवढे धान्य शेतकरी देत असता परंतु आता दहा,वीस रुपये देऊन मोबदला कमी येत असल्यामुळे मोकळे होतात.
मेहनत जास्त व या वडिलोपार्जित व्यवसायाकडे बांधव पाठ फिरवत आहेत.
रामदास बारकू भागवत,व्यावसायिक, लासलगाव (वेळापूर)



