डुबेरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला वाचनाचा आस्वाद
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
सिन्नर दि १६ ऑक्टोंबर प्रतिनिधी:-
डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न, भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रामदास वाजे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक दिंगबर जाधव, सोमनाथ गिरी ,कचेश्वर शिंदे,सोमनाथ पगार,अरुण डावरे,विद्या ठाकरे,सविता खंडागळे ,राजेंद्र गांगुर्डेआदी उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यालयातील ७५० विद्यार्थ्यांनी वाचनाचा आस्वाद घेतला.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास वाजे म्हणाले की,मोबाईल संस्कृतीमुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. पर्यटनापेक्षा वाचन स्वस्त आहे .ज्ञान प्राप्तीचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे पुस्तकांचे वाचन होय.
वाचनाला वेळेचे बंधन नसते.वाचनामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो.
विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले पाहिजे.वाचनाने बुद्धी तलखं होते.
म्हणून विद्यार्थ्यांनी पुस्तकांचा आस्वाद घ्यावा. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज वाचन करण्याचा संकल्प करावा असे आव्हान वाजे यांनी केले.
उपशिक्षक सुनिल ससाणे यांनी डॉ. कलाम यांच्या जीवन व कार्याची ओळ्ख करून दिली.मी वाचलेले पुस्तक याविषयी अंकिता ढोली,गौरी वाजे, आरोही जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी केले तर आभार डी. एच.जाधव यांनी मानले.
यावेळी मारुती डगळे,रेखा खंडीझोड, सीमा गोसावी, सुनिता ढोली,जयश्री गोहाड ,वरिष्ठ लिपिक राणी शिंदे आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.