Breaking
संपादकीय

शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय पाटील यांचा व्हाइस ऑफ मीडिया नाशिक जिल्हा पदाधिकारींकडून जोरदार निषेध

नाशिक मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 9 0 2 1

न्यायभूमी

नाशिक दि.३० जून 

समाजभान विसरलेल्या आणि संपत्तीचा माज आलेल्या लोकप्रतिनिधी कडून प्रसार माध्यम प्रतिनिधींना जिवे मारुन संपवण्याच्या मग्रुरीसह शिवराळ भाषा वापरणारे बेताल लोकप्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय पाटील यांचा व्हाइस ऑफ मीडिया नाशिक जिल्हा पदाधिकारींकडून जोरदार निषेध करुन पोलिस प्रशासनाने गांभीर्याने गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोमवार दिनांक 29 जून, 2026 रोजी नाशिक जिल्हा प्रशासनाचे मा. जिल्हाधिकारी यांना देण्यात येणारे निवेदन प्रतिनिधी म्हणून उप जिल्हाधिकारी मा.कुंदन हिरे यांनी स्विकारले.तसेच मा.पोलिस आयुक्त नाशिक महानगर यांनाही निवेदन देण्यात आले.

सदर निवेदन मा. सह आयुक्त दीपक मिटके यांनी स्विकारले.’व्हाइस ऑफ मीडिया’ नाशिक जिल्हा अध्यक्ष (सुप्रीमो) दिलीप साळुंके यांच्या नेतृत्वात आणि राज्य समन्वयक कुमार कडलग,महानगर जिल्हा अध्यक्ष कपिल भास्कर,सरचिटणीस ब्रिज परिहार,नाशिक तालुका अध्यक्ष कानिफ गडाख, अनिल शिंदे,शिवाजी कातोरे,सुदाम ढगे,गजानन भालेराव,दिपक भालेराव,विजय आल्हाट, अशोक गायकवाड,रोहिदास जाधव,चंदू धोंगडे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने निवेदन दिले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आमच्या संतप्त भावना अणि मागण्या राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री,मा.उप मुख्यमंत्री आणि राज्य पातळीवरील पोलिस प्रशासनाकडे पोहोचाव्यात अशी विनंती करण्यात आली.

यावेळी शिष्ट मंडळाने दिलेले निवेदन मी स्विकारले असून आपल्या भावना निश्चितच वरिष्ठांनी पर्यंत पोहोचवती अशी ग्वाही जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन कडून देण्यात आली.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे