Breaking
आरोग्य व शिक्षण

दिव्य ज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत मोफत दप्तर वाटप

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 2 0 9 7

न्यायभूमी न्यूज

कोटमगाव दि १८ जुलै प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर

सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद कोटमगाव या शाळेत दिनांक 17/7/2025 रोजी आमच्या मॉडेल स्कूल कोटमगाव येथे दिव्य ज्योत बहुउद्देशीय संस्था यांचे कडून गरजू विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत दप्तराचे वितरण करण्यात आले.

या दप्तरामध्ये केवळ वही पुस्तक नाहीत तर त्यांच्या प्रेमाचा आणि समाजप्रती असलेल्या जबाबदारीचा सुगंध दडलेला आहे,म्हणून दप्तर एक केवळ वस्तू नसून ते प्रेरणादायक आहे.

त्यातून आपल्याला शिकायला मिळतं की, समाजात अजूनही माणुसकी आणि मदतीचा हात पुढे करणारी माणस आहेत.

या उदार हस्तांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात मिळणाऱ्या योगदानाबद्दल मी मुख्याध्यापिका श्रीमती जयमाला जगताप शाळेच्या वतीने शिक्षकांच्या वतीने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानते.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय सौ.आरती ताई कडाळे, प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे संविधान व्याख्याते तुषार पगारे,बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुनीताताई कांबळे,सचिव श्री संजय बोराळे, सदस्य विशाल गरड,जयश्री बोराडे,संजय पगारे, राहुल सोनवणे,मनीषा बधान,कीर्ती मढे, चंद्रकला गांगुर्डे,भाऊसाहेब तात्या गांगुर्डे,संतोष शिंदे,बहुसंख्य पालक तसेच त्यांच्या संस्थेचे इतर सदस्य हे उपस्थित होते.

महाराष्ट्राचे संविधान व्याख्याते सर सन्माननीय तुषार पगारे यांनी शाळेच्या शिस्तीबद्दल विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत तसेच स्वच्छतेबाबत खूपच समाधान व्यक्त केले.

तसेच प्रत्येक वर्गाला भेट देऊन मुलांच्याअभ्यासातील प्रगतीचा आढावा घेतला.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बघून तर त्यांना खूपच समाधान वाटले.आम्हा सर्व शिक्षकांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.

शाळेचा कायापालट करणारे प्रशासन बघून त्यांनी सांगितले की, आम्ही आवर्जून शिक्षणाधिकारी व C.E.O मॅडम यांना शाळेचा आलेख किती उंचावलेला आहे हे सांगू. शाळेचा,गावाचा आणि देशाचा कायापालट करू शकतील असे शिक्षक हे आपल्या कोटमगाव नगरीत आहेत हे त्यांचे बोलणे ऐकून आम्ही तर भारावूनच गेलो.

त्याचबरोबर शिक्षकांना अतिशय उच्च दर्जा देणारे महान व्यक्ती आजही आपल्या समाजात आहेत. 

या सर्व टीमचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि आमचे विद्यार्थी शिक्षणात अजून प्रगती करून या दानशूर व्यक्तींच्या विश्वासाला योग्य ठरतील अशी ग्वाही देते.

जयमाला जगताप

 मुख्याध्यापिका

माॅडेल स्कूल कोटमगाव

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे