“मानसिक आरोग्य हा सर्वांगीण आरोग्याचा अविभाज्य घटक आहे”न्यायाधीश डॉ विक्रम अंबादास आव्हाड
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी

मेढा,दि.१६ ऑक्टोंबर मा.ना.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली,मा.ना.उच्च न्यायालय,मुंबई,महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई,आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सातारा यांचे आदेशान्वये शुक्रवार (ता.१६) रोजी सकाळी ०९.०० ते १०.१५ दरम्यान ग्रामीण रुग्णालय मेढा येथे जागतिक मानसिक आरोग्य उत्सहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी डॉ.विक्रम आव्हाड, दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा,वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल कांबळे,डॉ.अभिजीत महामूलकर,डॉ. सचिन पाटील,डॉ.नारायण पिसे तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड आर एस पोफळे,ॲड.ए.के. शेटे,ॲड.एन.एस.पवार,ॲड.ए.ए.लकडे,ॲड.पी. डी.गोरे व ग्रामीण रुग्णालय व न्यायालयीन इतर कर्मचारी,तसेच रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक मानसिक आरोग्य दीना निमित्त कायदे विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिर घेण्यामागील उद्देश काय आहे.तसेच मानसिक आरोग्य खालावल्या मुळे नैराश्य, चिंता,एकटेपणा या विषयी ॲड.एन.एस.पवार यांनी मार्गदर्शन केले.
तसेच ॲड.ए.के.शेटे यांनी आपले मानसिक आरोग्य कसे व्यवस्थित ठेवले पाहिजे यावर मार्गदर्शन केले, ॲड. लकडे यांनी आपण आपले मानसिक स्वास्थ्य कसे जपले पाहिजे त्यासाठी कोण कोणत्या पद्धती अवलबिल्या पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल कांबळे यांनी मानसिक आरोग्य विषयी किती काळजी घेतली पाहिजे,औषधे सगळेच आजार बरे करत नाहीत काही आजार हे मानसिक असतात ते संभाषण व योग्य मार्गदर्शन याने बरे करतात या विषयी मार्गदर्शन केले.
या शिबिराचे प्रमुख पाहुणे डॉ.विक्रम अं . आव्हाड दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मेढा यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिन हा दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
या वर्षाची थीम ही ‘सेवांमध्ये प्रवेश – आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य’ अशी आहे.
याबाबत तसेच मानसिक आरोग्य कायदा यातील तरतुदीं साध्या आणि सोप्या भाषेत समजून सांगितल्या.
शिबिर यशस्वीतेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे संदीप गार्डे,मेढा न्यायालयाचे अवधूत कुलकर्णी, प्रशांत लिंगडे,आप्पा आवटे,विधी स्वयंसेवक प्रतीक्षा जाधव,श्रावणी काशीलकर,श्री ऋषिकेश शिंदे,पंकज मगदूम या सर्वांनी विशेष योगदान दिले.



