Breaking
ब्रेकिंग

उंदरगाव येथे स्व. अरुण आबा नाईकवाडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन

न्यायभूमी मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 9 0 2 1

न्यायभूमी दि.३० जून 

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अविरत कार्यरत राहिलेले व्यक्तिमत्त्व स्व.अरुण (आबा) बाजीराव नाईकवाडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ उंदरगाव येथे मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आबांच्या सामाजिक कार्याची आठवण म्हणून आणि त्यांचा जनसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी ‘अरुणोदय फाउंडेशन’ आणि ‘अश्विनी नेत्रालय, कुर्डूवाडी’ यांच्या वतीने या विशेष आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर बुधवार, दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ‘नवजीवन हॉस्पिटल, उंदरगाव’ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये कुर्डूवाडी येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.अनिल वायकुळे आणि डॉ.विद्या वायकुळे हे रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत, तसेच गरजूंना चष्म्यांचे मोफत वाटपही केले जाणार आहे.

समाजाच्या आरोग्यदायी दृष्टीसाठी एक पाऊल पुढे टाकण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.

या समाजोपयोगी शिबिराचा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन निमंत्रक निफाडचे तहसीलदार विशाल अरुण नाईकवाडे, नवजीवन हॉस्पिटलचे डॉ.विकास अरुण नाईकवाडे आणि अरुणोदय फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे