प्रशासनाने फुटलेली पाईप लाईन लवकरात – लवकर दुरुस्त करावी सविस्तर वृत्त
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे
न्यायभूमी न्यूज
चांदवड दि १० मार्च
चांदवड शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ येथील हॉटेल माथेरान समोर पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन जेसीबीच्या साहाय्याने फुटलेली असल्याने या पाईप लाईन मधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
दि. ९ मार्च २०२५ रोजी सकाळी सात वाजता ही पाईपलाईन जेसीबी च्या सहाय्याने फुटलेली आहे. दुपारचे साडेबारा वाजले आहेत तरीही पाणी बंद झाले नाही. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने लोकांमध्ये संतप्ततेचे व तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
कडक उन्हाळा असल्याने शहरातील लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने लोकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे.
परंतु,नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
पाईपलाईन फुटली तिथे मोठा खड्डा असल्याने हे पाणी दिसून येत नव्हते. जमीन भुसभुशीत होऊन पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाया जात आहे.
चांदवड शहरामध्ये लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी ८ -१० दिवस वाट बघावी लागते. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू असल्याने पाणीपुरवठा अधिकारी व्यवस्थित पाणीपुरवठा करू शकत नाही. सण असले तरीही नगरपरिषदेत पाणीपुरवठा करत नाही.
प्रशासनाने फुटलेली पाईपलाईन लवकरात – लवकर व तात्काळ दुरुस्त करण्यात यावी व हे वाया जाणारे पाणी बंद करण्यात यावे.
अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने नगर परिषदेसमोर आमरण उपोषण व तीव्र स्वरुपाच्या आंदोलन छेडण्यात येईल.
असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी सर्व नागरिक उपस्थित होते.


