Breaking
महाराष्ट्र

लोकनेते दत्ताजी पाटील स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 5 3 0 3

न्यायभूमी न्यूज

लासलगाव दि ०६ फेब्रुवारी  सुनील पोळ

लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या एकोणतीसाव्या स्मृती सोहळ्या अंतर्गत “रक्तदान शिबिराचे”आयोजन लोकनेते दत्ताजी पाटील प्रतिष्ठान,लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक,लासलगाव शिक्षण सहायक मंडळ,जनकल्याण ब्लड बँक व लासलगाव डॉक्टर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर संपन्न झाले.

या रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी कै.लोकनेते दत्ताजी पाटील व सरस्वती मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी”अमर झाले दादा तुम्ही …..”या स्वरांजली द्वारे कै.दत्ताजी पाटील यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

रक्तदान शिबिराचे उदघाटन लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ स्वप्निल जैन यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

सदर शिबिराचे अध्यक्ष म्हणून डॉ.गौरव काळे उपस्थित होते. या शिबिरासाठी डॉ सुरेश दरेकर,डॉ भाऊसाहेब रायते,डॉ अरुण काळे,डॉ अशोक महाले,डॉ विजय केंगे,डॉ मुस्ताक मुलाणी, डॉ रोहित शेळके,डॉ पौरव गांगुर्डे व जनकल्याण ब्लड बँकेच्या डॉ वैजयंती निकम,शैलेश पंडित, बाळासाहेब चिंचोरे,सीमा गोसावी,विनय शौचे,डॉ मिलिंद राठी,प्रदीप देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील,सचिव संजय पाटील,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर,संचालिका नीताताई पाटील,पुष्पाताई दरेकर,शंतनू पाटील,अभय पाटील,सिताराम जगताप,लक्ष्मण मापारी,कैलास ठोंबरे, लासलगावच्या सरपंच योगिता पाटील,डॉ कैलास पाटील,डॉ युवराज पाटील,डॉ अविनाश पाटील,डॉ अनिल बोराडे,योगेश पाटील,प्रकाश गांगुर्डे,किशोर क्षिरसागर,दिलीप पानगव्हाणे,दिलीप देसाई,तुळशीराम जाधव,शाहू होळकर,साहेबराव वाजे, भागवतराव होळकर,राजेंद्र होळकर,प्रकाश कापडी,लासलगाव प्रेस क्लबचे उमेश पारीख,हारुन शेख,शेखर देसाई,अरुण खांगळ,आसिफ पठाण,समीर पठाण,निलेश देसाई,राकेश बोरा,प्राचार्य रमेश सोनवणे,मुख्याध्यापिका रोशनी गायकवाड,मुख्याध्यापक मोहन निकम,पर्यवेक्षक विजय वाणी, कौतिक आवारे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 3 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे