सकल हिंदू समाजातर्फे लासलगाव येथे श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
निफाड ( लासलगांव ) दि १२ मार्च
तालुका प्रतिनिधी जनार्दन चव्हाण
लासलगांव येथे होळी ते हनुमान जन्मोत्सव या काळात पंधरा दिवस श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गेल्या दोन वर्षापासून या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

शहरातील विविध मंदिरामध्ये सात हनुमान चालीसा पठण कार्यक्रम हा धार्मिक सोहळा संपन्न होणार असून
शनिवार दिनांक १५ श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर,
मंगळवार दिनांक १८ सर्वे नंबर ९३ आंबे माता मंदिर,
शनिवार दिनांक २२ लक्ष्मीनारायण मंदिर,
मंगळवार दिनांक २५ गणेश नगर येथील दुर्गा माता मंदिर,
शनिवार दिनांक २९ श्री हनुमान मंदिर ब्राह्मणगाव विंचूर,
रविवार दिनांक ३० बालाजी मंदिर,
मंगळवार दिनांक ०१
श्रीराम नगर येथील क्रांती चौक,
शनिवार दिनांक 0५ पिंपळगाव नजीक येथील हनुमान मंदिर,
रविवार दिनांक 0६ बाबा अमरनाथ मंदिर वेळ ०४ वाजता,
सोमवार दिनांक ०७ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विद्यानगर,
मंगळवार दिनांक ०८ श्रीराम मंदिर टाकळी विंचूर,
बुधवार दिनांक ०९ साईबाबा मंदिर लासलगाव,
गुरुवार दिनांक १० गणेश मंदिर गणेश नगर,
शुक्रवार दिनांक ११ श्री हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन लासलगाव.
आणि श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखेरचा पाठ शनिवार दिनांक १२ श्रीराम मंदिर लासलगाव येथे संपन्न होणार आहे.
सर्व भाविकांनी दररोज रात्री ०९ वाजता या श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.



