श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगाव च्या लक्ष्मी माता मंदिरात दुर्गा अष्टमी उत्सव संपन्न
न्यायभूमी न्यूज लासलगाव निशिकांत पानसरे
न्यायभूमी दि.०५ ऑक्टोंबर

श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगाव च्या वतीने नुकतेच प्राणप्रतिष्ठा झालेल्या लक्ष्मी माता मंदिरात दुर्गा अष्टमी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता या उत्साहामध्ये दुर्गा माता मंदिरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळी नित्यनेमाने सवाद्य तालावर आरती संपन्न होत होती.
या आरतीमध्ये परिसरातील बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत होते आरती संपन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रसादाचे वाटप करण्यात येत होते भाविक भगिनी स्वच्छने प्रसादाचे वाटप करत होते.
या दहा दिवस चाललेल्या दुर्गा अष्टमी महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा बंधू-भगिनीसाठी आयोजित करण्यात आलेले आहेत.
यामध्ये स्त्रियांसाठी संगीत खुर्ची व रांगोळी स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला
तसेच सकाळ संध्याकाळी विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले यामध्ये भक्ती गीते जागरण गोंधळाचा कार्यक्रम व भजनी मंडळाचे देखील यामध्ये सहभाग होता.
लासलगावातील व परिसरातील मोठ्या संख्येने भाविक बंधू भगिनी घेणे सहभाग घेतला तसेच लासलगाव बाजार समितीचे व्यापारी दुकानदार ज्येष्ठ नागरिक संघ लासलगावचे ज्येष्ठ बंधू भगिनी दररोजच्या होणाऱ्या आरती मध्ये व दुर्गाष्टमी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला.
11 दिवस चाललेल्या दुर्गा अष्टमी महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्रीराम मंदिर ट्रस्ट लासलगावचे अध्यक्ष श्री अशोक नाना होळकर, डॉक्टर कैलास पाटील,डॉक्टर युवराज पाटील, सुरेश वडनेरे,विष्णू निकम,कवी प्रकाश होळकर, नानासाहेब पाटील,भरत पाटील तसेच लासलगावचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य सी एस पाटील,एस आर शिंदे,अरविंद देसाई, एकनाथ थोरात,हिरामण घोडे,भरत वडनेरे, शिवाजी होळकर तसेच लासलगाव च्या सरपंच सौ योगिता पाटील,योगेश पाटील,शंतनू पाटील, स्वप्निल पवार,हेमंत जगताप,देविदास पाटील, राजेश कराड,राजेंद्र जाधव,राजाराम बोराडे, बाळासाहेब दराडे,लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अध्यक्ष श्री शिंदे साहेब,शिंदे वकील, वेळापूर जोशी गुरु व परिसरातील नागरिक बंधूभगिनींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन दुर्गा अष्टमी महोत्सव संपन्न केला झाला.
विजयादशमीच्या दिवशी पिंपळगाव नजीक च्या दुर्गा माता मंडळाने दुर्गामाता दौड आयोजित केलेली होती.
या दौडमध्ये मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले होते दुर्गामाता दौड ची सुरुवात पिंपळगाव नजीक मधून सुरुवात होऊन लक्ष्मी माता मंदिर परिसरात आल्यानंतर डॉक्टर कैलास पाटील यांनी फटाक्यांचे आतिश बाजी करून कार्यक्रमाची सांगता केली.



