नाशिक जिल्हा भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळावा श्री.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय,काकासाहेब नगर रानवड येथे दि.६ते९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित
मेळाव्याचे उद्घाटन निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते
न्यायभूमी न्यूज
रानवड दि १० फेब्रुवारी प्रदिप वाघ
नाशिक जिल्हा भारत स्काऊट गाईड जिल्हा मेळावा श्री. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय,काकासाहेब नगर रानवड येथे दि.६ते९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला आहे.या मेळाव्याचे उद्घाटन निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त अजिंक्य वाघ,म.वी.प्र.सरचिटणीस नितीन ठाकरे,लासलगाव बाजार समिती संचालक भीमराज काळे,

राजेश गडाख,बाळासाहेब वाघ,विलास वाघ,आनंदराव वाघ,संगीता गायकवाड,रामदास वाढवणे,प्राचार्य गोविंद कुशारे हे मान्यवर उपस्थित होते.
स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण आमदार दिलीप बनकर यांनी केले.या प्रसंगी मेळाव्यातील स्काऊट गाईड पथकाने उत्कृष्ट संचलन करत मानवंदना दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कैलास पाटील यांनी स्काऊट गाईड चळवळीचा इत्यंभूत इतिहास मांडला.
स्वर्गीय डॉ.वसंतराव पवार यांनी प्रथमतः जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते याच परंपरेचे पाईक होत मेळावा परंपरा आपण सर्व अखंडपणे सुरू ठेवूयात.
विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची कृतियुक्त शिकवणं देणारे व्यासपीठ म्हणजे जिल्हा मेळावा.रानवड ही सहकार महर्षी काकासाहेब वाघ यांची भूमी असल्याने संघभावना, बंधुता, नेतृत्व,सहकार्य, समदाय सेवाभाव ह्या मातीचा उपजत गुण आहे तो निश्चितपणे विद्यार्थ्यांमध्ये प्रवर्तित होईल असे प्रतिपादन आमदार बनकर यांनी आपल्या अध्यक्षिय मार्गदर्शनातून केले.
म.वी. प्र.सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली की,स्काऊट गाईड चळवळीचा मुख्य उद्देश स्वावलंबी , सुसंस्कृत, सुजाण नागरिक घडवणे हा आहे.या चळवळीत जडण घडण झालेल्या पिढ्या देशाची सर्वात मोठी शक्ती आहेत.अजिंक्य वाघ यांनी मेळावा आयोजन कमिटी पदाधिकारी व सदस्य यांचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल अभिनंदन केले.

उद्घाटन कार्यक्रम सूत्रसंचालन नवनाथ वाघचौरे यांनी केले.उपस्थितांचे आभार स्काऊट जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे, गाईड जिल्हा संघटक कविता वाघ यांनी केले.
जिल्हा मेळाव्यात जिल्ह्यातील ५४ शाळांतील ३६० स्काऊट व ४२९ गाईड, रोव्हर रेंजर,स्वयंसेवक यांच्यासह १००० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.


