Breaking
कृषीवार्ता

पावसाअभावी जिल्ह्यातील खरिपाची पिके धोक्यात:–कृषीतज्ञ,काँग्रेस नेते,सचिन होळकर

न्यायभूमी न्यूज

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज

लासलगाव दि ११ ऑगस्ट निशिकांत पानसरे

यावर्षी मे महिन्यापासून चांगल्या पावसाला सुरुवात झाली त्यामुळे साधारण मे–जून आणि जुलैच्या पहिल्या–दुसऱ्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यामध्ये मका,सोयाबीन तसेच इतर खरीप पिकांच्या पेरणीचे कामे शेतकऱ्यांनी केली.

मात्र गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला खंड पडल्याने खरिपाची ही पिके धोक्यात आली आहे.

मका आणि सोयाबीन पिकांची सध्या वाढीची अवस्था असल्याने या पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे.येत्या काही दिवसात महाराष्ट्रात तसेच नाशिक जिल्ह्यात सर्व दूर दमदार पाऊस न झाल्यास खरिपाची ही सर्व पिके धोक्यात येतील.

एकंदर वातावरण पाहता काही दिवसात पाऊस येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.

त्यामुळे खरिपाच्या पिकांचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घटनार असल्याची भीती नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस, प्रसिद्ध कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.कृषी विभागाने देखील पिकांच्या वाढीकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.

वेळप्रसंगी पंचनामे करावे लागतील. महाराष्ट्र शासनाने सुद्धा खरिपाच्या नुकसानीला मदत करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शक्य असल्यास वेगवेगळ्या सिंचन पद्धतीचा उपयोग करून पिकाला पाणी द्यावे.

त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा काढून घ्यावा याशिवाय सातबारावर पिकाची नोंद करून घ्यावी.

अशा महत्त्वाच्या सूचना होळकर यांनी दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे