राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या लासलगाव शहर कार्याध्यक्षपदी अल्ताफ हारून शेख यांची निवड
न्यायभूमी न्युज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्युज
लासलगाव दि १० ऑगस्ट निशिकांत पानसरे
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या लासलगाव शहर कार्याध्यक्षपदी अल्ताफ हारून शेख यांची निवड करण्यात आली.

या निवडीचे नियुक्तीपत्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते अल्ताफ शेख यांना देण्यात आले.
अल्ताफ शेख यांनी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब,अल्प संख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाई नाईकवाडी,कार्याध्यक्ष वसीमभाई बुऱ्हान यांच्या आदेशान्वये अल्ताफ शेख यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,मंत्री छगन भुजबळ यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकटीसाठी कार्यरत राहू,असे अल्ताफ शेख यांनी सांगितले.
अल्ताफ शेख यांचे अल्पसंख्याक आयोग सदस्य हुसेनभाई शेख,राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल मोमीन,आरिफभाई मन्सुरी, आसिफ शेख,इम्रान मन्सुरी अल्ताफ मनियार,मोहसीन शेख,रफिक अन्सारी,अझहर शेख,समीर शेख,आवेश पठाण,वसीम मन्सुरी, फैजान बेग,मोहसीन मन्सुरी,सुफियान सय्यद, शहेजाद शेख,समीर सिद्दीकी,व इतर यांनी अभिनंदन केले आहे.