विंचूर येथील अश्विनी नवले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महिला बालविकास अधिकारी परिक्षेत राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाने निवड
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
विंचूर दि ०६ जून अभय पाटील
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षण झालेल्या अश्विनी नवले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महिला बालविकास अधिकारी परिक्षेत राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.
त्याबद्दल नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी विंचूर दौऱ्यावर असताना अश्विनी नवले हिचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
विंचूर गावातील विविध सामाजिक कार्यकर्ते व पक्षांकडून अश्विनी नवले यांचा सत्कार करण्यात येत आहे.
विंचूर शहराला अभिमान वाटेल असे कामगिरी त्यांनी केल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे.
शहरातील तरुणांनी व तरुणांनी यांच्यासारखा आदर्श घ्यावा असे ज्येष्ठ नागरिकांनी आव्हान केले आहे.
याप्रसंगी नवले कुटुंबातील सदस्यांसह विलास गोरे,पांडुरंग राऊत,अनिल विंचूरकर,ओम राऊत, समाधान जेजूरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



