विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न; अर्पिता भट आणि मुस्तफा बोहरा यांना ‘प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार’ प्रदान
न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
मुंबई (चेंबूर): दि.१५ मार्च
चेंबूर येथील प्रसिद्ध विवेकानंद एज्युकेशन सोसायटी संचलित लॉ कॉलेज (VES Law College) मध्ये शनिवार,१४ मार्च २०२६ रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा (Alumni Meet) उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा ‘प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार‘ (Distinguished Alumni Award) यावर्षी ऍड.अर्पिता भट आणि ऍड. मुस्तफा बोहरा यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महाविद्यालयाच्या जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
विधी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अर्पिता भट आणि मुस्तफा बोहरा यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आपल्या मनोगतात दोन्ही पुरस्कारार्थींनी महाविद्यालयाने त्यांच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील डॉ.अर्चना खांडवे,डॉ.स्वप्नील चौधरी,प्रेरणा भंडारी,शामल पाटील आणि विद्यार्थी प्रतिनिधी श्रेया पांडे,सौरभ जोशी,प्राची अग्रवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
त्यांच्या नियोजनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने (Dinner) झाला.महाविद्यालयाच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ सध्याच्या विद्यार्थ्यांना मिळावा, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.


