प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा लादण्या विरोधात जामनेर मनसे चे पहूर व शेंदुर्णी येथील प्राथमिक विद्यालयांना राजसाहेबांनी लिहिलेलं पत्र सादर
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
जामनेर दि १९ जून विशेष प्रतिनिधी

दि.१९ रोजी जामनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने पहूर व शेंदुर्णी येथील काही शाळेचे मुख्याध्यापक यांना राज साहेब ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीला विरोध करणारे पत्र काढले होते त्या पत्राच्या प्रती आज मनसे जिल्हा सचिव डॉ विजयानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले.
यात सविस्तर माहिती अशी की राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या नावाखाली १ ते ४ चे वर्गांना तिसरी भाषा सक्तीची म्हणून लादू इच्छित होती मात्र मां राजसाहेब ठाकरे यांच्या मराठी बाण्यापुढे हिंदी सरकारला नमते घ्यावे लागले.
जनमत विरोधात जात असल्याचे पाहून त्यावेळेस हिंदी सक्तीची भाषा जीआर मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मात्र सरकार हे राजकारण खेळत असल्याचे नुकतेच हिंदी भाषेचे पुस्तके प्रकाशित करण्यात येत असल्याचे मनसे चे पदाधिकारी यांच्या निदर्शनास आले व हिंदी भाषा ही तिसरी भाषा अनिवार्य ऐवजी ती सर्वसाधारण भाषा म्हणून शब्दांचा खेळ करत ज्यांना हिंदी भाषा निवडायचे असल्यास ती ऐच्छिक भाषा म्हणून दुसऱ्या मार्गाने शब्दांचा खेळ करत त्या चिमुकल्या मुलावर लांदण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला आहे.
मात्र तुम्ही मनसे हिंदी भाषा सक्तीला कडाडून विरोध करणार आहेच पण आपण ही सर्व शाळा यांनी सरकारचे दबावाला बळी पडू नये या साठी मनसे कडून सूचित करण्यात येत असल्याचे राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व मुख्याध्यापकांना काढलेले पत्र पहूर येथील आर टी लेले हायस्कूल,डॉ हेडगेवार प्राथमिक विद्यालय पहूर,जिल्हा परिषद शाळा गोंदेगाव , आचार्य जी आर गरुड हायस्कूल शेंदुर्णी,स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी प्राथमिक विद्यालय शेंदुर्णी,श्री कृष्ण माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी, गुरुकुल इंग्लिश मिडीयम व गुरुकुल विद्या मंदिर शेंदुर्णी या शाळांना मनसे ने मराठी बचाव व हिंदी सक्ती हटाव जनजागृती करत निवेदन सादर केले आहे.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील,मनसे तालुका उपाध्यक्ष संदीप मराठे , पहूर शहर अध्यक्ष रतन देशमुख,गण अध्यक्ष अमोल पाटील,मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस वाल्मीक कोळी,तालुका सचिव किशोर बडगुजर,सागर कुमावत,गणेश चव्हाण,मुकेश दराके पहूर,नितीन पांढरे,गणेश राठोड,प्रमोद बडगुजर,अशपाक देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.


