Breaking
आरोग्य व शिक्षण

घोटी विद्यालयात कर्मवीर डॉ.वसंतराव पवार यांना अभिवादन

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 7 5

न्यायभूमी 

सिन्नर दि.०४ एप्रिल प्रतिनिधी सोमनाथ गिरी 

घोटी येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मराठा विद्या प्रसारक संस्थेचे भूतपूर्व सरचिटणीस कर्मवीर डॉ.वसंतराव पवार यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नितीन भामरे होते.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक उल्हास पवार,पर्यवेक्षक हिरामण चौधरी,ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ गिरी,अपर्णा उईके,निवृत्ती सदगर ,मुख्य लिपिक भाऊसाहेब रणशेवरे,वरिष्ठ लिपिक जीवन शिंदे,अनिल गोवर्धने,वैशाली विधाते,

ग्रंथपाल ओमकार सोनवणे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते डॉ.पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

साक्षी मोगल,शरयू पोतदार या विद्यार्थ्यांसह उपशिक्षिका सोनाली वाघ यांनी डॉ. पवार यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेतला.

      यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य नितीन भामरे म्हणाले की,डॉ.पवार यांनी शिस्त,गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीवर मविप्र संस्थेचा कारभार केला. संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक विस्तारासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.

डॉ.पवार यांचे सामाजिक,सहकार, राजकीय, शैक्षणिक,वैद्यकीय साहित्य आदिंसह विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.

सूत्रसंचालन पायल गिते यांनी तर आभार ऋतुजा शेळके हिने मानले.

यावेळी संपत शेंगाळ,कैलास पाचोरे,राजेंद्र देवगिरे,गायत्री सूर्यवंशी,घनश्याम भालेराव, प्रकाश तांबे,सुधीर काळे,हेमंत झोले आदींसह शिक्षक-शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

इयत्ता आठवी तुकडी फ वर्गशिक्षिका वृषाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे