Breaking
आरोग्य व शिक्षण

जनता ज्युनियर कॉलेज वडाळीभोई येथे’आरोग्य व रासायनिक शेती’विषयावर करिअर मार्गदर्शन संपन्न

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रेय दरेकर

1 1 5 6 5 8

न्यायभूमी 

​वडाळीभोई: दि.०४ ऑगस्ट सहसंपादक सुनील पोळ 

         येथील जनता ज्युनियर कॉलेज वडाळीभोई (कनिष्ठ महाविद्यालय) मध्ये करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत ‘आरोग्य व रासायनिक शेती’ या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात उपस्थितांनी आरोग्य, शेती आणि त्याशी संबंधित करिअरच्या विविध संधींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

​या कार्यक्रमास ‘SUNEDGE Marketing Pvt. Ltd. पुणे’ चे समन्वयक राजेंद्र पाटील सर,त्यांचे सहकारी सुनील पोळ यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील वापरत असलेले प्रॉडक्ट हे किती प्रमाणात केमिकल युक्त असतात यावरती मार्गदर्शन केले आणि ते केमिकल युक्त कसे ओळखावे हे यावेळी सांगण्यात आले.

पूजा निचित मॅडम यांनी सौंदर्य प्रसाधनामध्ये किती मोठ्या प्रमाणात होणारी भेसळ कशी ओळखावी हे त्यांनी सामाजावून सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र पाटील सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रासायनिक शेतीचे दुष्परिणाम,आरोग्यदायी पर्याय आणि शेती क्षेत्रातील आधुनिक व्यावसायिक संधी यावर सविस्तर माहिती दिली.

​ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सोमनाथ कोल्हे यांनी केले.त्यांनी या उपक्रमामागील भूमिका आणि आजच्या काळात अशा मार्गदर्शनाची गरज स्पष्ट केली.

            कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. मिलिंद गांगुर्डे यांनी केले.

​या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.अरुण ठाकरे,प्रा.संजय कासव,श्रीमती सुनिता कुंभार्डे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

उपस्थितांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतz विविध शंकांचे निरसन करून घेतले.अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

2/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 5 6 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे