आरोग्य व शिक्षण
जनता विद्यालय वडाळीभोई येथे माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1
2
3
9
5
0
न्यायभूमी
सहसंपादक सुनील पोळ
वडाळीभोई दिनांक ०२ ऑक्टोंबर
मविप्र समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव बाल विकास मंदिर वडाळीभोई येथे सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ संगीता सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.श्रीम लता कदम,श्रीम शोभा गायकवाड,श्री हिम्मत भदाणे व श्री दत्तात्रय भुसारे यांच्या नियोजनानुसार माहिती अधिकार दिनानिमित्त शालेय स्तरावर वकृत्व निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला .
1
2
3
9
5
0


