Breaking
महाराष्ट्र

रुईच्या जामा मशिदीत रंगली ‘इफ्तार पार्टी’; हिंदू-मुस्लिम बांधवांनी दिला सामाजिक एकतेचा संदेश!

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 9 7

न्यायभूमी 

रुई (प्रतिनिधी): दि.१९ मार्च

पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने रुई येथील जामा मशिदीमध्ये आयोजित करण्यात आलेली ‘इफ्तार पार्टी’ केवळ उपवास सोडण्याचा कार्यक्रम न ठरता,ती हिंदू-मुस्लिम सलोख्याचा आणि समतेचा जिवंत सोहळा ठरली.

या कार्यक्रमात गावातील सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येत भारतीय संस्कृतीमधील एकात्मतेचे दर्शन घडवले.

एकाच पंगतीत बसून घेतला इफ्तारचा आनंद

रमजानच्या उपवासाची सांगता करताना आयोजित या मेजवानीत गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेब पोटे यांनी इफ्तार पार्टीचे नियोजन करून दिले.

यावेळी,डॉ. श्रीकांत आवारे सर,ज्ञानेश्वर (अण्णा) तासकर,भागवत वाघ,बाळासाहेब गायकवाड, अनिल खंडागळे,अरुण कणसे,योगेश पोटे,सुरेश तासकर,अतुल गायकवाड,सौरव तासकर, भाऊसाहेब तासकर,संजय तासकर,धनंजय जगताप,मच्छिंद्र रोटे,किरण रोटे,यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांसोबत बसून इफ्तारचा आनंद घेतला.

जामा मस्जिद ट्रस्ट चे उपाध्यक्ष,श्याम बाबा काद्री,सचिव अमजद शेख,इसाकभाई शेख, इमरान शेख,सलीम शेख,अफजल शेख, सुफियान शेख,दाऊदभाई शेख,अझर शेख, आयुबभाई शेख,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवर एकमेकांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर राखत सण साजरे करण्याची ही परंपरा रुई ग्रामस्थांनी यंदाही मोठ्या उत्साहात जपली.

गावाच्या संस्कृतीची मोठी ताकद

आजच्या काळात जिथे सामाजिक सलोखा टिकवणे गरजेचे आहे,तिथे रुई ग्रामस्थांनी दिलेले हे उदाहरण दिशादर्शक आहे.

“एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होणे हीच आपल्या संस्कृतीची खरी ताकद आहे,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. मुस्लिम बांधवांनीही हिंदू बांधवांचे या स्नेहभोजनासाठी मनापासून आभार मानले.

उपस्थित मान्यवर या सोहळ्याला गावातील ज्येष्ठ नागरिक,तरुण मंडळी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अत्यंत शांततेत आणि भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची चर्चा परिसरात सर्वत्र होत आहे.

“माणुसकीचा धर्म सर्वात मोठा आहे, हेच या इफ्तार पार्टीने सिद्ध केले.” — ग्रामस्थ, रुई.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे