न्यायभूमी नासिक दि.१३ सप्टेंबर २०२५ सुनील क्षीरसागर

येवला तालुक्यातील बाभुळगाव बुद्रुक येथील युवक अभय पाटील (महावितरण कर्मचारी, लासलगाव) आणि योगेश (देवा) पाटील यांनी महामृत्युंजय मंदिर येवला येथील दर्शन घेऊन
केदारनाथ यात्रेसाठी मोटरसायकलवर प्रवास सुरू केला आहे.हे दोघे भक्त एच.एफ.डीलक्स मोटरसायकलवर उत्तराखंडातील केदारनाथ बाबाचे दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत.
त्यांचा प्रवास मालेगाव,इंदोर,उज्जैन,भोपाळ, आग्रा,मेरठ, हरिद्वार,ऋषिकेश,धारादेवी,श्रीनगर आणि शेवटी केदारनाथ (सोनप्रयाग) या मार्गावरून होणार असून,साधारण ३,५०० किलोमीटरचा हा प्रवास मोटरसायकलवर करण्याचा मानस आहे.
या यात्रेपूर्वी त्यांनी मागील वर्षीही उत्तराखंडमधील चार धामांचा मोटरसायकल प्रवास पूर्ण केला होता, त्यामुळे ही त्यांची दुसरी वर्षाची अशी यात्रा आहे.
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आई सुमन पाटील, वडील बाळासाहेब पाटील,भाऊ महेंद्र पाटील, वहिनी दिपाली पाटील,पुतण्या अचित पाटील व अबोली पाटील यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
तसेच तुळजाई होस्टेल बाभुळगाव येथील विद्यार्थी अनिकेत सूर्यवंशी,वैभव सूर्यवंशी, कृष्णा सोनार,धनंजय बागुल,ओमकार गांगुर्डे, तेजस गांगुर्डे,निखिल सोमवंशी,वैभव जोशी, धनंजय न्हावी,चेतन घुले,उमेश कापडणीस, सिद्धेश्वर दाभाडे व स्वप्निल गोरे यांनीही यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या यात्रेमुळे भक्त अभय आणि योगेश यांना आध्यात्मिक अनुभवासोबतच साहसपूर्ण प्रवासाचा आनंदही लाभेल,अशी अपेक्षा आहे.



