बालतरंग इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
सहसंपादक सुनील पोळ
चांदवड दि.१९ एप्रिल सहसंपादक सुनील पोळ
चांदवड येथील बालतरंग इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे चेअरमन शिरसाठ यांनी भूषविले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्य,गाणी,नाटिका आणि विविध कलागुणांनी कार्यक्रम रंगतदार झाला.
विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे कौतुक केले.
शाळेच्या शिक्षिका शीतल मॅडम आणि गायत्री मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन अतिशय उत्तम प्रकारे केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपली कला सादर केली.
अध्यक्षीय भाषणात शिरसाठ सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच शिक्षकांच्या परिश्रमांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाला पालक,शिक्षक आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


