नाशिक मा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नाशिक ची बिकट अवस्था
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग
न्यायभूमी न्यूज
नासिक दि ०३ जुलै विशेष प्रतिनिधी रोशन गव्हाणे
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहराची बकाल अवस्था झाली असून त्यांच्याच पक्षाचे शहर अध्यक्षांच्या पत्राला देखील केराची टोपली दाखवली जात असल्यास सर्वसामान्यांचे काय ?
असा सवाल करत राष्ट्रवादी पक्षाने मनपा कार्यालयात आंदोलन केले.
नाशिक शहराच्या रस्त्यांची चाळण झालेली असल्याने पावसाचे पाणी साचून अनेक ठिकाणी अपघात होत असल्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत.
तसेच नाशिक शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा देखील विस्कळीत झालेला असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे.
अनेक भागात टँकर ने पाणीपुरवठा केला जात असून देखील मोठ्या प्रमाणावर पाणीबिले पाठवून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याने सदरील अवाजवी पाणी बिलांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झालेली असून सदरील पणीबिले मागे घेण्यात यावीत.
शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करावीत,पाणीपुरवठा सुरळीत करावा पंचवटी मध्ये औषधे व धूर फवारणी होत नसल्याने डासांची संख्या वाढत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तरी नियमित औषधे व धूर फवारणी करावी आदी मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली उप आयुक्त श्री.रवींद्र धारणकर यांना देण्यात आले.
यावेळी ॲड.सुरेश आव्हाड,सचिन अहिरे,रंजना पगार,राहुल आहेर,योगेश गायकवाड,संदीप सोनवणे,सोमा चव्हाण,बाळासाहेब गांगोडे,सीमा नाईकवाडे,वसंत पगार,अर्चना निकम,मीना पेहेरकर,रंजना तांदळे,आदी उपस्थित होते.



