Breaking
महाराष्ट्र

चतुर्थी निमित्त लासलगावच्या इच्छापूर्ती गणपतीला २५१ किलो आंब्यांचा महानैवेद्य; ‘आंबा महोत्सव’पाहण्यासाठी भक्तांची गर्दी

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 2 0 9 7

न्यायभूमी 

लासलगाव दि.०५ मे महेश साळुंके

आज संकष्टी चतुर्थीच्या मंगल पर्वावर, येथील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर – ट्रस्ट आणि श्री अहिल्यादेवी मित्र मंडळ यांच्या वतीने एका भव्य ‘आंबा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

लासलगावच्या या लाडक्या बाप्पाच्या चरणी तब्बल २५१ किलो आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आली असून, भक्ती आणि फळांच्या राजाचा गोडवा यांचा एक अनोखा संगम येथे पाहायला मिळत आहे.

संकष्टी चतुर्थी म्हणजे गणेश भक्तांसाठी पर्वणीच. आज सकाळपासूनच मंदिरात भाविकांची रिघ लागली आहे.

त्यातच बाप्पाच्या गाभाऱ्यात करण्यात आलेली आंब्यांची सजावट आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरत आहे.

आंब्यांच्या नैसर्गिक सुवासाने संपूर्ण मंदिर परिसर दरवळून निघाला असून, बाप्पाचे दर्शन घेताना भक्तांना एक वेगळीच प्रसन्नता लाभत आहे.

 

 २५१ किलो आंब्यांची आरास भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून मोठ्या प्रमाणात आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे.

  या भव्य सजावटीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

  आंबा महोत्सवाच्या माध्यमातून भक्तीची गोडी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे.

श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर ट्रस्ट आणि अहिल्यादेवी मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष सोहळा आयोजित केला आहे.

तरी सर्व गणेश भक्तांनी या महोत्सवाचा आणि बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 2 0 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे