Breaking
महाराष्ट्र

तालुका विधी व सेवा समिती,येवला तर्फे आयोजित विधी सेवा सप्ताहात‘सायबर सुरक्षा’विषयावर व्याख्यान

न्यायभूमी न्यूज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 9 0 0 0 1

न्यायभूमी 

येवला दि.१५ नोव्हेंबर पुष्पा पाटील 

तालुका विधी व सेवा समिती,येवला यांच्या वतीने आयोजित विधी सेवा सप्ताह – नोव्हेंबर 2025 या उपक्रमाच्या निमित्ताने तालुका न्यायालय,येवला येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी डॉ गिरीशा बोंबले,संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख,तसेच प्रा.अदनान हबीब,सहाय्यक प्राध्यापक संगणक विभाग, डॉ.अजित भाने अधिष्ठाता विद्यार्थी विकास यांनी‘सायबर सुरक्षा’ या महत्त्वपूर्ण विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान दिले.

त्यांनी सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण,ऑनलाईन सुरक्षितता,आणि डिजिटल जबाबदारी यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

उपस्थित न्यायालयीन अधिकारी,पोलीस अधिकारी,वकील आणि समाजातील नागरिकांनी या सत्राचा लाभ घेतला.

डॉ. गिरीशा बोंबले यांनी या प्रसंगी डॉ.दिनेश यादव,प्राचार्य,एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय,श्री.समाधान झाल्टे,प्रशासकीय अधिकारी,जगदंबा शिक्षण संस्था,संचालक मंडळ,जगदंबा शिक्षण संस्था,बाभुळगाव तसेच न्यायालय व्यवस्थापन मंडळाचे आभार व्यक्त केले.

कारण त्यांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.एस.एम. बोहेरा,दिवाणी न्यायाधीश,येवला होते. कार्यक्रमास मा.श्रीमती डी.एम.गुलाटी, सहदिवानी न्यायाधीश मा.श्री.जे.आर.पठाण, सहदिवानी न्यायाधीश तसेच श्री.अनिल भवारी, पोलीस निरीक्षक,अ‍ॅडव्होकेट,आणि विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले असून उपस्थितांकडून जगदंबा शिक्षण संस्थेचे विशेष कौतुक करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे