Breaking
नोकरी

लासलगाव येथील खाकीच्या आतली माणुसकी : वृद्धेला आधार देणारा अधिकारी सविस्तर वृत्त

लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कराव शिंदे

0 8 9 9 8 8

न्यायभूमी न्यूज 

लासलगाव दि २८ में अभय पाटील 

२६ मे.. संध्याकाळची वेळ..सगळ्यांना घरी जायची घाई…अशात एक वृद्देचा गाडा रस्त्यात अडकतो…ट्राफिक जाम होते..कुणीतरी पोलिसांना फोन लावतो..काही मिनिटात सायरन वाजवत पोलीस गाडी येते..लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कराव शिंदे गाडीच्या खाली उतरतात.

आता वृद्देवर कार्यवाही होणार या भावनेत उपस्थित प्रत्यक्षदर्शी..मात्र झाले उलटेच..स्वतः शिंदे साहेबांनी गाडा बाजूला घेण्यास वृद्देला मदत केली आणि नको नको म्हणताना वृद्देला काही आर्थिक मदतही देऊ केली…या प्रकराने वृद्देला मदत न करता गंमत पाहणारे मात्र चांगलेच ओशाळले..

    झाले असे की, संध्याकाळी लासलगावतील मुख्य बाजार पेठेतील महादेव मंदिर परिसराजवळ एक वृद्ध महिला हातगाडीवर भाजी विक्री करून घराच्या दिशेने निघाली होती.

वयोमानामुळे आणि शरीरातील थकव्यामुळे चालणे अवघड होत होते.

रस्त्यात वृद्देचे त्राण गेल्याने गाडा काही लोटत नव्हता.

त्यामुळे गाडा रस्त्यात फसला, त्यामुळे ट्राफिक जाम झाली. गाड्यांच्या हॉर्नचा कालवा झाला, त्यामुळे वृद्दा अजून गोंधळली.. त्यामुळे कुणीतरी पोलिसांना फोन करून याबाबत कळवले.

लासलगाव पोलीस गाडीचा सायरन वाजला आणि परिसरात साशंकता पसरली “आता या वृद्धेवर कारवाई होते की काय?” असा प्रश्न अनेकांच्या मनात आला. पण काही क्षणांत जे चित्र दिसले, त्याने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.

सायरन थांबला,गाडी थांबली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे गाडीतून उतरले.

त्यांनी कोणताही त्रागा न करता त्या वृद्धेजवळ जाऊन विचारपूस केली.त्यांच्या हात गाडीला स्वतः हात लावून ती बाजूला नेली आणि रस्त्यावरील अडथळा दूर केला.

इतकेच नव्हे, तर खिशातून पैसे काढून त्या वृद्धेच्या हातात दिले आणि तिला घरी पोहोचवण्यासाठी पोलिसांची व्यवस्था केली.

   हा प्रसंग पाहून वृद्देला मदत न करता मजा बघणारे मात्र ओशाळले,कुणीही मदतीसाठी पुढे न आलेल्या परिस्थितीत एक पोलीस अधिकारी माणुसकीने उभा राहिला.

बाजारात अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. कर्तव्य आणि करुणा यांचा एकत्रित अनुभव इतका जिवंतपणे क्वचितच पाहायला मिळतो.

शिंदे साहेबांची ही कृती एखाद्या सरकारी जबाबदारी पुरती मर्यादित नव्हती,ती होती एका माणसाच्या मनाची ओळख खाकीत वावरणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल अनेकदा कठोर छबी असते.

पण अशा संवेदनशील कृतीमुळे समाजातील दुर्बल घटकांसाठी पोलीस व्यवस्थेचा ‘आधारवड’ वाटावा, अशी भावना तयार होते.

भास्करराव शिंदे यांची ही कृती एखाद्या सरकारी जबाबदारीपेक्षा अधिक आहे. ती आहे “माणूस म्हणून उभं राहण्याची ओळख.” अशा अधिकाऱ्यांमुळे पोलिसांविषयीचा विश्वास आणि सन्मान वाढतो. 

केवळ कायदा पाळायला लावणारे अधिकारी नसतात, तर समाजातील दुर्बल घटकांना हात देणारे आधारवड ठरतात.

3/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे