Breaking
आरोग्य व शिक्षण

कृषि महाविद्यालय बाभुळगाव मार्फत श्रमदान शिबिर

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 9 0 0 0 1

न्यायभूमी न्यूज 

येवला दि १३ जानेवारी पुष्पा पाटील 

जगदंबा शिक्षण संस्था संचलित, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषि महाविद्यालय बाभुळगावमार्फत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन सत्यगाव ता. येवला जि.नाशिक या ठिकाणी करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन सत्यगावचे सरपंच मा.श्री. सुनील सांगळे व वि.का. सोसायटीचे चेअरमन मा. श्री. शंकर दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. व्हि.डी शेंडे व प्राचार्य डॉ. डी. पी. कुळधर होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए.व्ही. ठोंबरे यांनी केले. व सूत्रसंचालन श्रीकर जाधव यांनी केले.

या शिबिरादरम्यान विविध उपक्रमांचे व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.

उपक्रमांमध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षरोपण, व्यसनमुक्ती, अवयव दान जनजागृती अभियान, योगाभ्यास, चित्रकला व निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी, वृक्ष संवर्धन, मंदिर परिसर सुशोभीकरण, शोष खड्डे निर्माण,पथनाट्य सादरीकरण, इत्यादींचा समावेश होता.

व्याख्यानामध्ये प्राचार्य डॉ. डी. पी. कुळधर व उपप्राचार्य डॉ. एस. डी. म्हस्के यांनी आजचे युवा व शेती विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

तसेच 10 जानेवारी रोजी निनानी अग्रो बायोटेक चे मा. श्री. अनंत पाटसकर यांनी शेतकऱ्यांना कांदा पीक उत्पादन विषयी मार्गदर्शन केले.

व्यसनमुक्तीपर पथनाट्याचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमास सत्यगाव गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरादरम्यान गावातील लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला 

संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री. दत्तू दराडे वि.का. सोसायटीचे चेअरमन श्री.शंकर दराडे प्रमुख अतिथी म्हणून गावची सरपंच श्री.सुनील सांगळे लाभले.

या शिबिरामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थी स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांचा मान्यवरांच्या वतीने गौरव करण्यात आला, आणि श्रमसंस्कार शिबिराचा सांगता करण्यात आला.

सदरचे शिबिर यशस्वी करण्यासाठी रा.से. यो. अधिकारी प्रा. ए. व्ही.ठोंबरे, प्रा. डॉ. ए. के. पराडे, कृषी सहाय्यक श्री.एम.एस. पेंढारी,

श्री. पी.एन.सानप आदींनी परिश्रम घेतले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे