Breaking
महाराष्ट्र

जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी 

जवळा बाजार दि.१३ जानेवारी

जिल्हा परिषद प्रशाला स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ माँ साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रसंगी सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती,विद्यार्थी सुरक्षा समिती यांची बैठक,तंबाखू मुक्ती अभियान अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन,तसेच वर्ग सजावट स्पर्धा या सर्वांचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी व्यसनमुक्ती विषयावर बार्टी,पुणे चे समतादूत एडवोकेट रहीम शेख यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

वर्ग सजावट स्पर्धेचे संपूर्ण आयोजन व तयारी श्रीमती पाटील मॅडम यांनी केली.

सदर स्पर्धेत वर्ग 6 वा प्रथम,वर्ग 5 वा दुसरा व वर्ग 8 वा तृतीय असा क्रमांक पटकावला त्यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला.

सदर स्पर्धेतील विजेत्यांना शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री नागेश चाकोतकर यांच्या मार्फत बक्षिस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी मुलांनी मराठी,इंग्रजी आणि हिंदी भाषण मध्ये भाषण उष्कृठपणे सादरीकरण केले.वर्ग सजावट स्पर्धा मध्ये विद्यार्थी आणि त्यांचे वर्ग शिक्षक यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी उद्घाटक म्हणून सरपंच स्वातीताई अंभोरे यांनी आपले विचार मांडले आणि आपल्या सुमधुर आवाजामध्ये गीत गाऊन मुलांचा उत्साह वाढवला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री मुळे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाटील मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दिपके मॅडम,तालेवार मॅडम,मिरा मॅडम,एडवोकेट खंडेलवाल साहेब,मुळे सर, सोनवणे सर,पटले सर,कराड सर,वर्षा मॅडम, भोसले सर,रइस सर,साखरे सर,नागेश चाकोतकर व श्री राठोड सर या सर्वांनी भरपूर परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे