Breaking
महाराष्ट्र

“विंचूर-येवला पंचक्रोशीचा अभिमान – अभय व योगेशचे केदारनाथ धाम दर्शन”

“मोटरसायकलवरून ४५० कि.मी. रोजचा प्रवास – अखेर लाभले केदारनाथाचे दर्शन”

0 8 9 9 8 8

न्यायभूमी न्यूज 

विंचूर (ता.निफाड.जि.नाशिक),दि.२६ सप्टेंबर प्रतिनिधी : सुनील क्षिरसागर

श्रद्धा असेल तर काहीही अशक्य नाही हे दाखवून दिले आहे येवला तालुक्यातील बाभुळगाव बु.येथील अभय पाटील (महावितरण कर्मचारी,लासलगाव) व योगेश उर्फ देवा पाटील (लासलगाव) या दोघांनी.बाबा भोलेनाथांवरील दृढ श्रद्धेमुळे या दोघांनी तब्बल १७०० किलोमीटर मोटरसायकलवरून प्रवास करत केवळ चार दिवसांत केदारनाथ धाम गाठले आणि भगवान केदारनाथांचे दर्शन घेऊन समाधान मिळवले.

प्रवासाची सुरुवात व वाटचाल

११ सप्टेंबर २०२५ रोजी येवला येथून या दोघांचा मोटरसायकल प्रवास सुरू झाला.

मनमाड,मालेगाव,इंदौर,उज्जैन,भोपाळ,हरिद्वार, ऋषिकेश,श्रीनगर अशी ठिकाणे पार करत हे दोघे सोनप्रयाग येथे पोहोचले.

तेथून ७ कि.मी.लोकल टॅक्सीने गौरीकुंडला पोहोचून उर्वरित २६ कि.मी.अंतर त्यांनी पायी चालून पूर्ण केले.

शेवटी एकादशीच्या पावन दिवशी त्यांनी केदारनाथ मंदीरात दर्शन घेण्याचे भाग्य प्राप्त केले.

भक्तीचा आदर्श

दररोज ४५० ते ५०० कि.मी. अंतर मोटरसायकलवरून पार करत त्यांनी फक्त चार दिवसांत केदारनाथला पोहोचण्याचे मोठे आव्हान पूर्ण केले. साधारण माणसाला रोज १०० कि.मी. प्रवास जड जातो,पण या दोघांनी दाखवून दिले की श्रद्धा,भक्ती आणि जिद्द असेल तर सर्व काही शक्य आहे.

ग्रामस्थांचा अभिमान

बाभुळगाव,विंचूर,लासलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ,पत्रकार बांधव,महावितरण कर्मचारी, नातेवाईक व मित्र परिवार यांनी या प्रवासाचे स्वागत केले असून त्यांच्या यशस्वी यात्रेसाठी सर्वांनी सुख,शांतीभरभराटीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

“जय श्री केदारनाथ बाबा”च्या जयघोषात या भक्तीमय प्रवासाला मानाचा सलाम करण्यात येत आहे.

परतीचा प्रवास

केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर या दोघांनी परतीचा प्रवास सुरू केला असून,तब्बल १८०० कि.मी.अंतर परत पार करीत ते चार दिवसात वार मगळवार दि.२३ सप्टेंबरला आपल्या गावी पोहोचले आहेत.

5/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे