महावितरण कर्मचाऱ्याच्या मृत्यप्रकरणी वारसांना 72 लाख रुपयांची नुकसान भरपाई
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी न्यूज
निफाड दिनांक १३ सप्टेंबर सहसंपादक सुनील पोळ
निफाड जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवार 12 सप्टेंबर 2026 येथील लोकन्यायालयात मोटार अपघात नुकसान भरपाई प्राधिकरण समोर चाललेल्या दाव्यात,अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या एका महावितरण कंपनीत कामाला असलेल्या व्यक्तीच्या वारसांना तब्बल 72 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून देण्यात यश आले आहे.
चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी सोबत लोक अदालतीमध्ये पॅनल समोर झालेल्या तडजोडी अंती हा महत्त्वपूर्ण निर्णय लोकन्यायालयात देण्यात आला.
मयत नितीन बापू सोनवणे (वय 26) हे महावितरण कंपनीत कार्यरत होते. दिनांक 30/11/2025 रोजी एका अपघातात त्यांचे अकाली निधन झाले.
कुटुंबाचा मुख्य आधार हरपल्याने त्यांच्या पश्चात त्यांची आई जिजाबाई सोनवणे व वडील बापू सोनवणे यांनी निफाड येथील मे.मोटार अपघात नुकसान भरपाई प्राधिकरणाकडे नुकसान भरपाईसाठी दावा अर्ज क्र. 02/2026 दाखल केला होता.
हा दावा चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या विरुद्ध दाखल करण्यात आला होता. या दाव्यावर शनिवार रोजी सुनावणी होऊन दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने तडजोड झाली.
या तडजोडी अंती विमा कंपनीने मयताच्या वारसांना 72 लाख रुपये देण्याचे मान्य केले.
ही तडजोड यशस्वीरीत्या घडवून आणण्यासाठी चोलामंडलम इन्शुरन्स कंपनी सी.टी.ओ. प्रविण पाठक, राष्ट्रीय व्यवस्थापक सुब्बीह एम., प्रादेशिक व्यवस्थापक विशाल गुप्ता, झोनल मॅनेजर प्रेमानंद पी, कायदेशीर व्यवस्थापक संतोष मोरे, राजेशकुमार, नयन थोरात व श्रद्धा पुर्णपात्रे यांचे सहकार्य लाभले. याकामी अर्जदारातर्फे ॲड गोविंद लक्ष्मण दुधे व ॲड. रवींद्र घोटेकर यांनी, तर इन्शुरन्स कंपनी तर्फे ॲड. नंदू फसाले यांनी कामकाज पाहिले.
निफाड येथील पॅनल हेड मा. अ.अ.अ.शेख साहेब आणि पॅनल सदस्य ॲड. एल.एस.वाघ यांच्या पॅनलसमोर ही तडजोड प्रक्रिया पार पडली.
सदर प्रसंगी नुकसान भरपाई चा धनादेश देताना मा. उच्च न्यायालय येथील न्यायमूर्ती तसेच नाशिक जिल्हा पालक न्यायमूर्ती जितेंद्र जैन उपस्थित होते.
मिळालेल्या या भरघोस नुकसान भरपाईच्या रकमेवर मयताच्या वारसांनी समाधान व्यक्त केले असून, न्यायालयाच्या या निर्णयामुळे दुःखात असलेल्या कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.



