खडक माळेगाव बिबट्याच्या दहशती खाली सविस्तर वृत्त
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
खडक माळेगाव दि.१८ फेब्रुवारी राजेद्र जाधव
खडक माळेगांव आणि परिसरात बऱ्याच दिवसापासून बिबट्याचा बिनधास्त वावर दिसून येत आहे त्यामुळे शेतात वस्तीवर राहणारे शेतकरी दिवसा तसेच रात्रीही बिबट्याच्या दहशतीने धास्तावले आहे.
शेतात कामासाठी जाणाऱ्या महिला मजूरही कामावर जाण्यास टाळाटाळ करत आहे अशा परिस्थितीत शेतकरीही चिंतेत आहे त्यातच काल रात्री 10:30 वाजता शिवाजी जगन्नाथ रायते यांचे वस्तीवर बिबट्याने गाईंच्या गोठ्यातून एक लहान वासराचा बळी घेतला रात्री शेतात वस्तीवर शेतकरी घराबाहेर निघून जनावरांची देखभालही करू शकत नाही.
माळेगाव दरसवाडी परिसरातही बिबट्या आढळून आला अनेकांनी बघीतलाही शेतकऱ्यांनी सावधान सावधानतेचा इशारा म्हणून फोटो मोबाईलवर टाकले एकंदरीत बिबट्या मुळे वातावरण भीतीचे झाले असून शासनाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना सहकार्य करावे असे मागणी परिसरातून होताना दिसत आहे



