Breaking
नोकरी

खडकमाळेगाव उपकेंद्रातील व्हायरल व्हिडिओने खळबळ!

दसरा पूजेच्या व्हिडिओत कर्मचारी गणवेशाविना? महावितरण प्रशासन काय कारवाई करणार

1 3 1 0 0 2

न्यायभूमी

खडकमाळेगाव दिनांक २४ ऑक्टोंबर 

लासलगाव उपविभागांतर्गत खडकमाळेगाव येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात दसरा पूजेनिमित्त यंत्रचालक व इतर कर्मचारी पूजा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये एकही कर्मचारी गणवेशात दिसत नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

वीज वितरणासारख्या महत्त्वाच्या सेवेत कर्मचाऱ्यांच्या गणवेशाबाबत नेमके नियम काय आहेत? संबंधित कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन केले आहे का?

व्हिडिओची सत्यता तपासून वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का? नियमांचे उल्लंघन आढळल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?

गणवेशाचे नियम केवळ कागदावरच आहेत का? व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 3 1 0 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे