कुणाल दराडे फाउंडेशनच्या भव्य रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

न्यायभूमी
येवला :दिनांक २४ नोव्हेंबर पुष्पा पाटील
दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रांगोळी स्पर्धेला यंदा ३०० हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे यंदा सातवे वर्ष असून, सोमवार (दि. २३ नोव्हेंबर २०२६) रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

महिला, युवती तसेच बालकलाकारांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि भारतीय संस्कृतीतील पारंपरिक रांगोळी कलेचा वारसा जतन व्हावा, या उद्देशाने कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून या स्पर्धेचे सातत्याने आयोजन केले जात आहे.
यंदा संस्कार भारती रांगोळी, डॉट रांगोळी, १४ वर्षांखालील गट, फ्री हॅण्ड रांगोळी आणि प्लाय/बोर्ड रांगोळी अशा पाच विविध प्रकारांत स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटात स्पर्धकांनी आपल्या कल्पकतेतून आणि कलाकौशल्यातून आकर्षक रांगोळ्या साकारल्या. काही स्पर्धकांच्या विशेष कलाकृतींची दखल घेत त्यांनाही विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
१. संस्कार भारती रांगोळी
– प्रथम : स्वाती भागवत
– द्वितीय : सेजल आसार
– तृतीय : ऋतिका मनोज भावसार
– चतुर्थ : माया टोपणे
२. डॉट रांगोळी
– प्रथम : ईशा देवेंद्र पटेल
– द्वितीय : प्रीती संतोष लोखंडे
– तृतीय : ऋतुजा मनीष मिसाळ
– चतुर्थ : स्नेहल सुरज नागपुरे
३. १४ वर्षांखालील गट
– प्रथम : पलक परदेशी
– द्वितीय : तेजस्विनी कुक्कर
– तृतीय : धैर्य पटेल
– चतुर्थ : मनुजा राजपूत
४. फ्री हॅण्ड रांगोळी
– प्रथम : अदिती पटेल
– द्वितीय : ज्योती कुक्कर
– तृतीय : निकिता आरने
– चतुर्थ : दर्शना परदेशी
५. प्लाय/बोर्ड रांगोळी
– प्रथम : प्रियंका पटेल
– द्वितीय : अदिती पटेल
– तृतीय : अमृता सतीश गुजराथी
– चतुर्थ : भक्ती करंजकर
विशेष पारितोषिक विजेते :
ज्योती भोसले, प्रतीक वाघ, रुद्राक्ष वाघ, वेदांत खिंडारे आणि प्रीतम कुक्कर यांना त्यांच्या विशेष कलाकृतींसाठी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण संगीता पटेल, प्रिया वर्मा, नलश्री पटेल आणि सुप्रिया गोसावी यांनी केले. बक्षीस वितरण समारंभाला कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुणालजी दराडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला, युवती, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थिती लावली.
गेल्या सात वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक महिला, युवती आणि बालकलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे. यंदा ३०० हून अधिक स्पर्धकांनी नोंदविलेला सहभाग हा फाउंडेशनच्या या उपक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेचा प्रत्यय देणारा ठरला.
महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.




