Breaking
महाराष्ट्र

लासलगाव संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात दीपोत्सव संपन्न

1 4 0 6 0 9

न्यायभूमी 

लासलगाव दिनांक २१ नोव्हेंबर कैलास उपाध्ये 

मैत्रेयी महिला मंडळाच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त भव्य दीपोत्सव व रांगोळी स्पर्धा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख अतिथी अध्यक्ष कृ.उ.बा.समिती मा. सभापती तथा विद्यमान संचालक सुवर्णाताई जगताप तर प्रमुख पाहुणे मैत्रेयी मंडळ सदस्य सौ राजश्रीताई सबनीस माऊली परिवाराच्या श्रीमती कलावती ताई जगताप होत्या मैत्रेयी मंडळ अध्यक्ष सौ स्मिता कुलकर्णी यांनी मैत्रेयी महिला मंडळाच्या सामाजिक कार्याची माहिती देत चालू असलेले उपक्रमांची माहिती दिली.

दरवर्षी कार्तिकी एकादशी निमित्त मंदिरात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो, रांगोळी स्पर्धेचे हे प्रथम वर्ष असून लहान मुलींपासून महिलांपर्यंत सर्वांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद लुटला सौ सुवर्णाताई जगताप यांनी रांगोळीचे परीक्षण केल्यानंतर प्रथम दीपोत्सव पहिला दिवा त्यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लावण्यात आला नंतर कार्यक्रमांचे विजेते घोषित करण्यात आले रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कादंबरी कुलकर्णी, द्वितीय क्रमांक अर्चना कुलकर्णी, तृतीय क्रमांक विभागून प्राजक्ता भंडारी, दिपाली कुलकर्णी यांचा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना ब्राह्मण सेवा मंडळ संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर उभारण्यापासून आतापर्यंत सुरू असलेल्या उपक्रमांची दखल सुवर्णाताईंनी घेत एक चांगल्या प्रतीचे समाज उपयोगी कार्य मंदिराच्या व मैत्रेयी महिला मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येते असे सांगत पुढील सर्व उपक्रमास त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमास रंजना शिंदे,पूजा भावसार,अनिता खैरे या सामाजिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्चना कुलकर्णी यांनी केली मनमोहक सायंसंध्या व उजळणाऱ्या पणत्यांच्या उजेड्यात माऊलींची मूर्ती व परिसर उजळून निघाला या सदरील कार्यक्रमास विशेष योगदान ऍड प्रथमेश कुलकर्णी, ब्राह्मण सेवा मंडळाचे अध्यक्ष मयूर भंडारी, सामाजिक सेवक निलेश जगताप, मंदिर व्यवस्थापक सुशील जोशी व गणेश जोशी यांचे लाभले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तृप्ती केंगे, प्राजक्ताभंडारी, रजनी कुलकर्णी ,शलाका कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, सरला दीक्षित, संपदा भंडारी, सुजाता भंडारी, अक्षदा जोशी,मंजुषा केंगे, प्रिया केंगे, भाग्यश्री जोशी, मोक्षदा भंडारी, दिपाली कुलकर्णी, ईश्वरी केंगे, स्वरा जोशी, आदिती जोशी यांचे बहुमोल योगदान लाभले सदरली कार्यक्रमास परिसरातील महिला व बांधव उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 0 6 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे