Breaking
महाराष्ट्र

विंचूर येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५६ वी जयंती उत्साहात साजरी

1 4 0 6 3 8

न्यायभूमी 

विंचूर (नाशिक) दिनांक २१ नोव्हेंबर ​सुनील क्षिरसागर 

विंचूर येथील समस्त शिंपी समाज बांधवांच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५६ वी जयंती मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.

    जयंतीनिमित्त पहाटे किरण नवले यांनी सपत्नीक श्री संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे व प्रतिमेचे षोडशोपचार पूजन करून अभिषेक केला. यानंतर सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत आरती व भजनाचा भक्तीमय कार्यक्रम पार पडला.

     कार्यक्रमानंतर समाज बांधवांच्या वतीने भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू व केळी या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा समस्त शिंपी समाज बांधव आणि भाविकांनी लाभ घेतला.

      याप्रसंगी ज्ञानदेव कल्याणकर, किरण नवले, विजय क्षीरसागर, सोमनाथ कल्याणकर, अरुण कल्याणकर, कैलास कल्याणकर, विजय झनकर, अनिल कल्याणकर, योगेश खर्डे, संजय बोढाई, प्रमोद बागलाने, रत्नाकर घटे, आनंदा नागमोते व पत्रकार सुनील क्षीरसागर उपस्थित होते.

तसेच बकरे, क्षीरसागर, झनकर, कल्याणकर, नवले, बागलाने व खर्डे कुटुंबातील महिलांसह समस्त शिंपी समाज बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 4 0 6 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे