संकटाच्या काळात भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात!
आर्थिक मदतीसह मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यातही सहकार्याचे आश्वासन; सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचा प्रत्यय

न्यायभूमी
कोटमगाव (प्रतिनिधी) दिनांक २० नोव्हेंबर
ज्ञानेश्वर भवर
सारोळे खुर्द येथील राजू भगरे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच भगरे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने कुटुंबासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

या परिस्थितीची माहिती मिळताच कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. कुणाल नरेंद्र दराडे यांनी भगरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच या कठीण प्रसंगी कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मयत राजू भगरे यांच्या पाल्यांच्या भविष्याचाही विचार करून त्यांच्या शिक्षणात भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण निर्माण झाल्यास कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून शक्य ती सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन श्री. कुणाल नरेंद्र दराडे यांनी दिले.
समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे.
दुःखाच्या प्रसंगी भगरे कुटुंबाला दिलेला हा आधार त्यांच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच दिलासादायक ठरणारा आहे.
याप्रसंगी योगेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शिवा पा. सुरासे, डॉ. विलास कांगणे, सतीश भोसले, राहुल भोसले, निवृत्ती वनसे, अश्विन भोसले, अमोल शिंदे, विलास भोसले, रावसाहेब भोसले, शिवा सुरसे, शुभम भोसले, ललित भोसले, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब जेउघाले, रवी जेउघाले, बाळू डांबळे आणि नाना पवार आदी उपस्थित होते.






