स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त एस.एन.डी.इंग्लिश मीडियम स्कूल बाभूळगाव येथे प्रेरणादायी कार्यक्रम
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

न्यायभूमी
येवला दि.१३ जानेवारी पुष्पा पाटील
दिनांक 12 जानेवारी रोजी शाळेमध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या वेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित भाषणे,तसेच राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श मातृत्व व राष्ट्रनिष्ठेवर आधारित मनोगत सादर केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी कविता व विचारमंच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाप्रसंगी गीता भक्त परिवार सदस्य श्रीमती सोनाली कलंत्री यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिलेला “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” हा संदेश आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचा आहे,हे स्पष्ट केले. तसेच राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार,राष्ट्रप्रेम व स्वराज्याची प्रेरणा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर चरित्रावर काही गोष्टी ऐकवल्या जेणेकरून अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी एकाग्रता साधावी यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या लहानपणातील अनेक कथा विद्यार्थ्यांना सांगितल्या त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत एकाग्रतेचे मूर्तीमंत उदाहरण दिले.
याप्रसंगी शिक्षकांनीही आपले विचार मांडत विद्यार्थ्यांनी या दोन्ही महान व्यक्तींच्या विचारांचा अंगीकार करून आदर्श नागरिक घडवावेत,असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, चारित्र्यनिर्मिती व राष्ट्रसेवेची शपथ घेतली.
या कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री.निलेश शिंदे उपप्राचार्य श्री.संदीप पाटील,बंड सर,शेळके मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती,नैतिक मूल्ये व नेतृत्वगुणांची जाणीव निर्माण झाली.



