Breaking
क्रिडा व मनोरंजन

गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी रयत कटिबद्ध – अ‍ॅड.भगीरथ काका शिंदे

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 8

न्यायभूमी

विंचूर दि.१७ डिसेंबर मुख्य सपादक दत्तात्रय दरेकर

दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रयत चषक क्रीडा स्पर्धा (विंचूर गट) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला-विज्ञान महाविद्यालय,विंचूर येथे उत्साहात संपन्न झाल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन तसेच नियोजित शरदचंद्रजी पवार साहेब स्टेज चे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड.भगीरथ काका शिंदे,लासलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे,जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ,उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य सुनील मालपाणी,कार्यक्रमाचे अध्यक्ष व सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदिश जेऊघाले, उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे लाईफ मेंबर राजेंद्र चांदे यांनी पाहुण्यांची ओळख करून देत कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या असून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी अ‍ॅड. भगीरथ काका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ व सल्लागार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, विद्यालयाच्या विविध कमिटीच्या सन्माननीय सदस्यांच्या प्रयत्नातून विंचूर गटात रयत चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते,असे त्यांनी सांगितले.

यंदाही सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध बक्षिसे मिळवली, असे त्यांनी नमूद केले.

मार्गदर्शन करताना सहायक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी क्रीडेमुळे शिस्त, संयम, सांघिक भावना तसेच अपयश पचवण्याची ताकद मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

प्रमुख अतिथी अ‍ॅड. भगीरथ काका शिंदे यांनी आपल्या भाषणात रयत शिक्षण संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. डिजिटल क्रांतीची सुरुवात रयतेतून झाली असून आधुनिक काळाची गरज ओळखून यावर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयाची सुरुवात रयतेतील प्रत्येक शाखेत करण्यात आली आहे.

यासाठी प्रत्येक वर्गात इंटरॲक्टिव्ह पॅनेलसारखी आधुनिक साधने बसविण्यात आली असून त्याचा लाभ विद्यार्थी व पालकांनी अधिकाधिक घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.विविध उपक्रम व प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

यानंतर विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे ट्रॉफी देऊन कौतुक करण्यात आली,.

कार्यक्रमास शालेय सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ गोरे,नानाभाऊ गाडे, पी.के.जेऊघाले,नानाभाऊ जेऊघाले,सुमनताई दरेकर,संदीप जोशी,राजेंद्र क्षीरसागर,मधुकर दरेकर,इमरान मोमीन,अनिल वाघ,विंगकर बाबा, चांदोरी येथील ग्रामस्थ माणिकराव गायखे,अमृतराव टरले,टरले सर,भोज सर, वनसगावचे ग्रामस्थ धनंजय डुंबरे,राणूजी कापडी,शिवाजी शिंदे अशोक डुंबरे,एकनाथ शिंदे,आडगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक साठे आर टी,रुई विद्याचे प्रचार्य चव्हाण ए डी,जानोरी विद्यालय चे मुख्याध्यापक लोणारी पी बी, टाकळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहिरे एम पी,मा.मुख्याध्यापक रोटे सी डी,शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमाताई शिरसाठ, विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदामराव माळी,आहिरे जे डी सचिव रयत चषक, खजिनदार गायकवाड डी आर,सदस्य,निलेश खोंडे,घनश्याम मोरे, आकाश टरले,गोसावी व्ही आर,शांताराम खैरनार,संतोष फुलमाळी,शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य पालक ग्रामस्थ, विंचूर गटातून उपस्थित सर्व शिक्षक स्पर्धक विद्यार्थी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका चव्हाण यू.ए. व सावळे ए.वाय.यांनी केले,तर आभार उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे यांनी आभार मानले.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे