विंचुरमध्ये रंगणार सुपर होममिनीस्टर खेळ पैठणीचा सह कॅामेडी धमाका…
मुख्यसंपादक दत्तात्रय दरेकर
न्याय भूमी : सुनील क्षिरसागर दि.२४,
विंचूर (नाशिक) : नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून विंचुर येथे रंगणार पुणे येथिल प्रसिद्ध कॅामेडी निवेदक बिभीषण गदादे प्रस्तुत सुपर होममिनीस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम. विंचूर येथिल जय भवानी नवरात्र महोत्सव समिती व विंचुरकर ग्रामस्थांनी सोमवार दिंनाक २९ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले. महिला भगीनींच्या या कार्यक्रमात समस्त विंचुरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांमधील विजेत्या महिलांना मानाची पैठणी यासह अनेक आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दिंनाक २४ सप्टेंबर रोजी सचिन कुमावत सह पुष्पा ठाकूर, भैय्या मोरे, मृण्मयी मोरे ,हुसेन शिवदे, विलास शिरसाठ यांचा खान्देशी धमाका कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .तर २५ सप्टेबर ते २७ सप्टेंबर भव्य लकी ड्रा तर २८ तारखेला इंडियन आयडॅाल फेम जगदीश चव्हाण प्रतिक सोळसे व सुपरस्टार फेम वर्षा एखंडे यांचा इंडियन आयडॅाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या नवरात्र उत्सवात धम्माकेदार कार्यक्रमांमुळे रंगत येणार असल्याने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



