Breaking
महाराष्ट्र

विंचूर येथील रस्त्यामध्येच वाहनांची अतिक्रमण करणाऱ्यावर आता होणार कारवाई : भास्करराव शिंदे

न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

0 8 9 9 9 4

न्यायभूमी न्यूज 

विंचूर दि १० जून: प्रतिनिधी सुनील क्षिरसागर 

 विंचूर येथील मारवाडी पेठ,तसेच बाजार गल्ली, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयालगत रोड, ग्रामपालिके जवळ व श्रीराम चौक या रस्त्यावरील मोटरसायकलचे व कारचे बहुसंख्य प्रमाणात अतिक्रमणात कायम वाढत होत आहे. त्यामुळे छोटे- मोठे अपघात होत असतात.

तसेच मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविणे. मोटरसायकल गर्दीच्या मार्गावरून जोरात चालवणे, लहान मुलांच्या हातात मोटरसायकल चालविण्यास देणे.

यावर लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व त्यांचे सहकारी पथक काढून यांनी वेळोवेळी या रस्त्यावरील मोटरसायकल अतिक्रमण धारकांना सूचना दिल्या.

मोटरसायकलच्या टायर मधील हवा सोडून त्यांना जाणीव करून दिली,तरी पण वाहनधारक या गोष्टी विसरून पुन्हा नव्याने हे रस्त्यावर आपली वाहने उभी करतच असतात.

म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी वाहनधारकांना अशी सूचना केली आहे.

 यापुढे कोणते वाहन रस्त्यावर अतिक्रमित दिसले तर अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन त्या वाहनाचे पेपर,ड्रायव्हिंग लायसन वगैरेही चेक करण्यात येईल.

अशी विंचूर परिसरातील वाहनधारकांना त्यांनी या बातमीद्वारे सूचित करण्यात येत आहे.

4.5/5 - (2 votes)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे