Breaking
महाराष्ट्र

लासलगाव येथे एस आय आर नोंदणी बद्दल हलगर्जी करणाऱ्या बी एल ओ प्रांताचा कडक कारवाईचा इशारा

प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे

1 1 1 7 6 2

न्यायभूमी 

लासलगाव दि.२७ जुलै कैलास उपाध्ये

मतदार यादीचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण म्हणजेच प्रक्रियेत नाव वगळल्या जाण्याची भीती,कागदपत्रांच्या अटी आणि बीएलओ च्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने मतदारांना येणाऱ्या अडचणी व तक्रारींसंदर्भात सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.

एसआयआर (SIR) मधील प्रमुख अडचणी आणि तक्रारीनाव वगळण्याची भीती: सखोल पडताळणीदरम्यान माहिती किंवा पुरावे वेळेत न दिल्यास मतदार यादीतून नाव कट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

एन्युमरेरेशन फॉर्म भरताना आई-वडिलांची माहिती आणि फोटो मागितल्यामुळे अनेक नागरिकांमध्ये तांत्रिक गोंधळ उडाला आहे.

इतरत्र स्थलांतर केलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन व प्रक्रियेची माहिती न मिळाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.निवडणूक आयोगाच्या या विशेष मोहिमेची सविस्तर माहिती साठी लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयात उपस्थित 

प्रांत बाबासाहेब गाढवे नायब तहसीलदार नितीन बहिकर मास्टर ट्रेनर शेळके AERO अमोल सुरडकर, बीएलओ पर्यवेक्षक वायझर, लासलगाव,विंचूर,वाकद,नांदुर मध्यमेश्वर येथील सर्व ग्राम महसूल अधिकारी व लासलगाव तलाठी वाघ मॅडम सर्व शिक्षक उपस्थित होते.

लासलगाव येथील शिक्षक तुषार जैन बद्दल काही नागरिकांनी तक्रार प्रांत अधिकाऱ्या कडे करण्यात आली.

प्रांत यांनी तलाठी व शिक्षक यांना आदेश दिले की घरोघरी जाऊन सर्व नागरिकांच्या अर्जाची पडताळणी करण्यात यावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 1 7 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे