नाशिक येथील माजी नगरसेवक विनायक खैरे व निलेश आहेर यांच्या विरोधात खंडांचा गुन्हा दाखल
न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर
न्यायभूमी
नाशिक दि.२३ मे रोशन गव्हाणे
बेकायदेशीर प्लॉटवर कब्जा केल्याचा आरोप,मखमलाबाद परिसरात असलेल्या प्लॉटवर बेकायदेशीपणे कब्जा करून मोटर सायकल आणून शिवीगाळ करीत दमदाटी केली असून तसेच प्लॉट खाली करून दे नाहीतर त्या मोबदल्यात 90 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी माजी नगरसेवक – विनायक खैरे व त्याचा साथीदार निलेश मधुकर आहेर यांचे विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठरोड- मसरूळ लिंक रोड परिसरात मौजे मखमलाबाद शिवरातील प्लॉट हडप करून तो रिकामा करण्यासाठी फिर्यादी अतुल प्रभाकर आहेर यांना संशयित खैरे व त्यांच्या साथीदाराने खंडणीसाठी धमकवले आहे.
अतुल अहिरे यांच्या मालकीचा सर्वे क्रमांक 19/1/अ क्रमांक चा प्लॉट आहे,या प्लॉटवर 2019 पासून विनायक खैरे यांनी बेकायदेशीर कब्जा केला आहे.
अतुल आहेर यांचे छोटेसे किराणा दुकान आहे,व त्यांच्या कुटुंबाला सुद्धा जिवंत मारण्याची धमकी देत दोन्ही आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहे.

