Breaking
संपादकीय

विंचूर डिजिटल मीडियाच्या’अध्यक्षपदी दैनिक युवक आधारचे राजेश भडांगे,उपाध्यक्षपदी दैनिक पुढारीचे मच्छिंद्र साळुंके

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 9 5

न्यायभूमी

विंचूर दि.१४ ऑक्टोंबर : दत्तात्रय दरेकर

विंचूर शहर डिजिटल मीडिया संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून,अध्यक्षपदी दैनिक युवक आधारचे निफाड तालुका प्रतिनिधी पत्रकार राजेश भडांगे तर उपाध्यक्षपदी दैनिक पुढारीचे पत्रकार मच्छिंद्र साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

या निवडीप्रसंगी डिजिटल माध्यमाशी संलग्न सर्व पत्रकार उपस्थित होते.विशेषतः सुनिल क्षिरसागर,दत्तात्रय दरेकर,अभय पाटील,जनार्दन चव्हाण,संदीप धनवटे,रोहन सरोदे आदी पत्रकारांनी उपस्थित राहून नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

संघटनेचे मावळते अध्यक्ष सुनील क्षिरसागर यांनी एक वर्षांच्या रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण करून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

त्यांच्या कार्यकाळात संघटनेने डिजिटल माध्यम क्षेत्रात प्रभावी कामगिरी बजावली असून, त्यांच्या जागी सर्वानुमते राजेश भडांगे यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

डिजिटल पत्रकारांच्या संघटित शक्तीमुळे स्थानिक बातम्यांना नवे व्यासपीठ मिळावे, तसेच सामाजिक विषयांवर जनजागृती व्हावी.

या उद्देशाने नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल दोन्ही पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

 अध्यक्षांचे विचार

“विंचूर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील बातम्या अधिक प्रभावीपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. ग्रामीण भागातील प्रश्न,शेतकऱ्यांच्या समस्या आणि सामाजिक घडामोडी यावर वस्तुनिष्ठ व जबाबदारीने प्रकाश टाकणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

जनतेचा विश्वास जिंकणारी सकारात्मक पत्रकारिता करण्याचा आमचा निर्धार आहे.”

– अध्यक्ष राजेश भडांगे

 उपाध्यक्षांचे विचार

आजच्या डिजिटल युगात जबाबदार पत्रकारिता अत्यंत आवश्यक आहे.विंचूर डिजिटल मीडिया हा सत्य आणि निष्पक्ष बातम्यांचा मजबूत व्यासपीठ ठरेल,असा मला विश्वास आहे.

सर्व डिजिटल पत्रकारांनी एकत्र येऊन समाजहिताचे कार्य करावे आणि जनतेच्या आवाजाला योग्य दिशा द्यावी,हीच अपेक्षा आहे.”

– उपाध्यक्ष मच्छिंद्र साळुंके

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे