नांदूरमध्यमेश्वर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमनपदी किरण उबाळे यांची निवड
न्यायभूमी न्यूज संपादकीय विभाग

न्यायभूमी न्यूज
निफाड ( नाशिक) दि ०२ फेब्रुवारी प्रतिनिधी ज्ञानेश्वर भवर
नांदूरमध्यमेश्वर विकास सोसायटीचे माजी चेअरमन सोमनाथ कहाणे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी चेअरमन निवडणूक संपन्न झाली.
दत्तात्रय नाईकरे श्रेणीएक सहाय्यक निबंध निफाड व
सोसायटीचे सचिव जगताप
यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
चेअरमन पदा करिता किरण उबाळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना अविरोध घोषित करण्यात आले.
तसेच व्हाय चेअरमनपदी इंदुबाई शिंदे यांची निवड करण्यात आली.नाशिक जिल्हा परिषदचे माजी सदस्य भाऊसाहेब भवर यांच्या मार्गदर्शनाने वरील निवडणूक संपन्न झाली.
याप्रसंगी माजी चेअरमन सोमनाथ कहाणे,रामदास शिंदे,माणिक इकडे,बाळासाहेब गचाले, संजय उबाळे,दशरथ शिंदे,मधुकर आढाव, जगन्नाथ अनारसे,रंगनाथ अनारसे, संदीप उबाळे,बबन शिंदे,भागवत शिंदे, दादा पगारे,भारत कहाणे,सोसायटीचे मा. चेअरमन रामदास शिंदे सोसायटी सदस्य शीलाताई शेळके, हिरामण शेळके, भाऊसाहेब शिंदे, अंबादास उबाळे,नवनाथ वैद्य, राजेंद्र उबाळे, राहुल कहाणे, आदिनाथ गाजरे, पांडुरंग शिंदे व समस्त ग्रामस्थ नांदूर मधमेश्वर यांच्या सह उपस्थितित मान्यवरांनी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाय चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.