Breaking
कृषीवार्ता

मका उत्पादक शेतकऱ्यांना रोख भरपाई मिळावी:–काँग्रेस नेते,कृषीतज्ञ,सचिन होळकर

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

0 8 9 9 8 4

न्यायभूमी 

लासलगाव दि.२९ नोव्हेंबर निशिकांत पानसरे 

संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात मागील चार-पाच वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी मका पिकाला मिळणारे दर हे अत्यंत कमी आहे. सध्या बाजारामध्ये 700 रुपयांपासून ते 1600 रुपयांपर्यंत मका विकली जात आहे.

मात्र मक्याचा हमीभाव हा 2400 रुपये प्रति क्विंटल आहे. यावर्षी अतिवृष्टीचा मका पिकाला देखील फटका बसला त्यात अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले एकंदर मक्याचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घटले आहे.

अनेकांची मका सडली तर काहींची कणसे वाहून गेली असे असताना देखील मक्याला चांगला बाजारभाव मिळण्याची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. मक्याचा उत्पादन खर्च आणि इतर सर्व बाबी बघता सध्या मिळणारे दर हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही.

मका पीक हे पुढील उन्हाळी हंगामात देखील शेतकरी घेत असतो साधारण वर्षभर मका पिकाची लागवड होते असे असताना केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रमाण कमी करून त्या ऐवजी तांदूळ आणि मोल्यासिस पासून इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे त्यामुळे बाजारामध्ये मक्याच्या मागणीपेक्षा अधिक उत्पादन आल्याने बाजारभाव कोसळले आहे.

एकंदर ही सर्व परिस्थिती पाहता सरकारने जरी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले असले तरी त्यांचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार नाही.

या ऐवजी सरकारने हमीभावाचा भावांतराचा फरक शेतकऱ्यांच्या खात्यात रोख स्वरूपाने वर्ग करावा अशी मागणी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस,प्रसिद्ध कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

मका हे आपल्या शेतकऱ्यांचे प्रमुख अर्थार्जन देणारे पीक असल्याने राज्य आणि केंद्र सरकारने मका उत्पादक शेतकऱ्यांकडे सहानुभूतीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे