Breaking
गुन्हेगारी

पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर ५३५ किलो गांजा जप्त; तब्बल १ कोटी १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

न्यायभूमी न्युज संस्थापक अभय पाटील,मुख्य संपादक दत्तात्रय दरेकर

1 0 6 2 7 5

न्यायभूमी 

 नासिक जिल्हा दि.१५ जुलै कैलास उपाध्ये

नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळवत पिंपळगाव बसवंत टोलनाका परिसरात छापा टाकून ५३५ किलो गांजा जप्त केला.

या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून १ कोटी १२ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

       दि.१४ जुलै २०२६ रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना गुप्त माहिती मिळाली की,नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच.०६ बी.जी.१७७६ या क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गांजाची तस्करी केली जात आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचून वाहनाची तपासणी केली.तपासणी दरम्यान वाहनातून ५३५ किलो गांजा आढळून आला.या प्रकरणी राहुल शांताराम पाटील,वय ३३,रा.मुटकी,ता.जि.धुळे याला ताब्यात घेण्यात आले.

     या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २०(ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५३५ किलो गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १,१२,१४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) व अपर पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय व अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलिस निरीक्षक गणेश गुरव, स.पो.नि.रोहिदास भोर,सहा पोलिस उपनिरीक्षक चारोसकर,अंमलदार प्रशांत उगले,पो.हवा शिंदे व निकम,पो.शिपाई विकास वाळुंज यांनी मोलाची भूमिका बजावली.

• पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठी कारवाई

पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी नुकताच पिंपळगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.

त्यानंतर निरीक्षक गुरव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचत ही धडक कारवाई केली. कारवाईत कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

निफाड तालुक्यातील अंमली पदार्थांविरोधातील ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून, या कारवाईमुळे तस्करांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

2/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 0 6 2 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे