Breaking
आरोग्य व शिक्षण

निफाड तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन

1 1 6 8 3 7

न्यायभूमी 

निफाड दि.०६ ऑगस्ट

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कार्यकारणभाव समजून घेण्याची क्षमता विकसित करणे, विश्लेषणात्मक विचारांची जागृती करणे,स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे तसेच भावी वैज्ञानिकांना विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि देशभरातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे,या उद्देशाने शासनमान्य शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

 

यावर्षी “भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य (संधी) आणि आव्हाने” या मुख्य विषयावर निफाड तालुकास्तरीय विज्ञान मेळावा कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विंचूर येथे बुधवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

निफाड तालुक्यातील सर्व शासनमान्य माध्यमिक शाळांनी या विज्ञान मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,असे आवाहन पंचायत समिती निफाडचे गटशिक्षणाधिकारी विलासराव साळी साहेब, विद्यालयाचे प्राचार्य श्री.नंदकुमार देवढे सर तसेच निफाड तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष भोसले सर यांनी केले आहे.

1/5 - (1 vote)

न्यायभूमी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 1 6 8 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे