तमाम लासलगाव येथील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकिय परिवर्तनवादी जनतेच्या वतीने निषेध
वैजापुर तालुका या ठिकाणी मानवतेला काळींमा फासणारी घटना घडली असुन त्या घटनेत रोहित पठारे या बौध्द तरुणाची जातीयवादी मानसिकतेतून काहि समाजकंटकांनी निर्घनपणे हत्या केली त्या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्या संदर्भात

न्यायभूमी
लासलगाव दिनांक १४ नोव्हेंबर कैलास उपाध्ये

तमाम लासलगाव येथील जनतेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शन करून पोलिस स्टेशन पर्यंत लाँग मार्च करून निषेध व्यक्त करण्यात आला .
वैजापुर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रोहीत पठारे यांची वैजापुर तालुक्यातील जातीयवादी मानसिकतेतून आणी सामाजीक कार्य द्वेषातुन काहि समाजकंटकांनी निर्घनपणे हत्या केली रोहीत पठारे यांचे घरातून अपहरण करत त्याला मोटर सायकला बांधून फरफटत नेले त्याच्यावर टोकदार शस्त्राने त्याच्या शरीराला खोलवर जखमा करत त्याला अमानुश पणे मारहान केली त्याच्या तोंडावर मानवतेला लाजवेल अशे क्रूरकृत्य करत त्याच्यावर लघुशंका केली हि घटना अतीशय निर्दयी पणाची असुन त्यांची निर्धनपणे हत्या केली.
हि घटना अतीशय दूखद असुन त्या जातीयवादी समाजकंटकांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्या गुन्हेगारांनवर १) अन्याय अत्याचार प्रतीबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा, २) फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी, ३) आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ४) सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा, ५) सदर घटनेची एस आय टि मार्फतच चौकशी करावी६) पीडीत कुंटुबियांना सरक्षन देण्यात यावे ७) पीडीत कुंटुबातील दोन वारसांना शासकीय नौकरी देण्यात यावी, ८) तसेच शासना मार्फत आर्थीक सहकार्य करण्यात यावे, अशा विवीध मांगण्याचे निवेदन शासन दरबारी पोहच करुन समाज्याच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पीडीत कुंटुबाला न्याय मिळवुन द्यावा व गुन्हेगारांनवर कठोरात कठोर कारवाई करावी जेणे करुन या पुढे अशा घटना घडणार नाहि याची दखल घ्यावी.

