तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये शालेय खेळाडूंची जिल्हास्तरावर झेप
न्यायभूमी न्यूज सहसंपादक सुनील पोळ

न्यायभूमी
वडाळीभोई दिनांक ०५ ऑक्टोंबर
01 व 03 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व चांदवड तालुका क्रीडा समिती आणि जनता विद्यालय वडाळीभोई यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळीभोई येथील पोलीस स्टेशनच्या मागे डॉक्टर्स ग्राउंड वर संपन्न झालेल्या शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये मविप्र समाज संस्था नाशिक संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी खेळत जिल्हास्तरावरील आपले स्थान निश्चित करून शाखेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला.
यामध्ये मुलांपैकी यथार्थ दिलीप शिंदे 1500मी,कु समाधान बाबाजी बत्तीसे 600 मी आणि कु आदित्य सचिन जाधव 100 मी धावणे तर कु मयंक दीपक जाधव, सार्थक बापू बस्ते, समाधान बाबाजी बत्तीसे,विराज प्रभाकर आहेर या विद्यार्थ्यांनी 4*100 रिले या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळविले.कु आदित्य सचिन जाधव याने गोळा फेक स्पर्धेमध्येही द्वितीय क्रमांक मिळविला.
त्याचप्रमाणे मुली खेळाडूंपैकी कु ईश्वरी राजेंद्र जाधव 100मी, ईश्वरी ज्ञानेश्वर जाधव 200 मी, ईश्वरी दत्तात्रय शिंदे 400मी, ईश्वरी भीमा चव्हाण 600मी धावणे आणि 4*100 रिले या दोन्ही स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
कु गायत्री भाऊसाहेब जाधव हिने गोळा फेक व ऋतुजा दत्तू जाधव यांनी थाळीफेक या स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. या सर्व यशस्वी खेळाडूंचे व त्यांना विशेष मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री घनश्याम झुटे व श्री विश्राम मुरकुटे यांचे संस्थेचे तालुका संचालक मा डॉ.श्री सयाजीराव गायकवाड,शाळेच्या सन्माननीय मुख्यध्यापिका सौ संगीता सोनवणे, मविप्र समाज सोसायटीचे संचालक श्री मंगेश ठाकरे, माध्यमिक विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा श्री सुखदेव जाधव, उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा श्री निवृत्ती आहेर, अभिनव बालविकास मंदिरच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा श्री सिताराम जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री निवृत्ती घाटे व संपूर्ण शालेय परिवाराने अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
